देश
दिल्लीतील रामलीला मैदानावर INDIA आघाडीची विराट महारॅली; विरोधी पक्षांचे दिग्गज नेते एकवटले!

रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
नवी दिल्ली : २नोव्हेंबर २०२६
देशाची राजधानी दिल्ली येथील रामलीला मैदानावर आज INDIA आघाडीतर्फे भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये विरोधी पक्षांचे प्रमुख नेते, कार्यकर्ते, विद्यार्थी संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या महारॅलीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यासह अनेक प्रमुख नेते सहभागी झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, तेजस्वी यादव, फारुख अब्दुल्ला यांच्यासह INDIA आघाडीतील विविध पक्षांचे नेते या आंदोलनात सहभागी झाले.ठाणे जिल्हा काँग्रेस कमेटी अध्यक्ष चेतनसिंग पवार यांनी सहभाग नोंदवला.
कनॉट प्लेस ते रामलीला मैदान असा
रॅलीची सुरुवात दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरातून करण्यात आली. मिंटो रोड जंक्शनमार्गे अजमेरी गेट येथून हा मार्च रामलीला मैदानाकडे रवाना झाला. या वेळी कार्यकर्त्यांच्या हातात विविध पक्षांचे झेंडे आणि फलक दिसून आले. संपूर्ण परिसरात मोठी गर्दी जमली होती.