🔥 ट्रेंडिंग ଶ୍ରୀକ୍ଷେତ୍ରରେ ଆରମ୍ଭ ହେଲା ନବଦିନବ୍ୟାପୀ '... ઝનોર રોડ પર બે બાઇક અથડાઈ: ત્રણના મોત SCBରେ ମାନସିକ ରୋଗୀ ମୃତ୍ୟୁ ମାମଲା: ମାଡ଼ ମ... ପାର୍ବଣ ପୂର୍ବରୁ ପୋଲିସକୁ ବଡ଼ ସଫଳତା: ମୟୂର... निधौली कलाँ में श्री रामलीला महोत्सव क... நெட்டப்பாக்கம் தொகுதிக்குட்பட்ட மாற்று...
12 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मनोरंजन

तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या ‘हे पाखरू नवीन दिसते राव’ लावणीला ४५० के प्लस प्रेक्षकांची पसंती

✍️ रिपोर्टर: Anil Mallav 🗓 12 अक्टू. 2026, 10:45 AM 👁 21
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

तृप्ती फिल्म प्रोडक्शन निर्मित भाग क्रमांक १४५ – ‘हे पाखरू नवीन दिसते राव’ या लावणी

तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या ‘हे पाखरू नवीन दिसते राव’ लावणीला ४५० के प्लस प्रेक्षकांची पसंती

पुणे (प्रतिनिधी) | १२ ऑक्टोबर २०२६

तृप्ती फिल्म प्रोडक्शन निर्मित भाग क्रमांक १४५ – ‘हे पाखरू नवीन दिसते राव’ या लावणीने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले असून, सन २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या लावणीला गेल्या तीन वर्षांत ४५० के प्लस म्हणजेच ४ लाख ५० हजारांहून अधिक प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.

या लावणीचे लेखन तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते रामदास राऊत यांनी केले आहे. लावणीमध्ये ‘नृत्य बिजली सबसे जोरात’ शुभांजली थोरात यांनी आपल्या दमदार नृत्यकलेचे सादरीकरण केले आहे. तसेच या लावणीचे ऑडिओ रेकॉर्डिंग मेलडी मेकर्स, पुणे येथे करण्यात आले असून, सिद्दिकी लोहार यांनी आपल्या सुमधुर आवाजात गायन केले आहे.

लावणीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माता, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते रामदासजी राऊत यांनी आपल्या यूट्यूब चॅनलच्या सर्व सदस्यांचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले.

“आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि सहकार्यामुळे ‘हे पाखरू नवीन दिसते राव’ या लावणीला ४५० के प्लस प्रेक्षकांचा टप्पा गाठता आला. यापुढेही आम्ही आणखी एक नवीन लावणी घेऊन येत आहोत. त्यामुळे सर्व प्रेक्षकांनी आमच्या यूट्यूब चॅनलला भेट देऊन यापुढेही असेच प्रेम व सहकार्य द्यावे,” असे आवाहन रामदास राऊत यांनी केले.

तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या आगामी नव्या लावणीचीही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
📲Get App