तळोदा-धनपूर मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात; दुचाकीस्वारासह ६ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर...!!
यहाँ देखें:
▶️ YouTube
तळोदा-धनपूर मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात; दुचाकीस्वारासह ६ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर...!!
विभागीय प्रतिनिधी
तळोदा : तळोदा-धनपूर मार्गावरील रांझणी फाट्याजवळ दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वारासह बसमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
प्राप्त माहितीनुसार, तळोदा आगाराची बस (क्र. एमएच ०६ एस ८७४९) तळोदाहून धनपूरकडे जात होती. रांझणी फाट्याजवळ आली असता समोरून येणारी दुचाकी (क्र. एमएच ३९ एएफ ६३५३) अचानक बससमोर आली. दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी चालकाने बस वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या दरम्यान दुचाकी बसखाली अडकली.
या अपघातात दुचाकीस्वार संजय जंगलसिंग पाडवी हे गंभीर जखमी झाले. तर बसमधील प्रवासी निकिता अनिल बोरसे, रुक्माबाई झीपा हिरे, शकुंतलाबाई झीपा हिरे, जिजाबाई देविदास नाईक आणि भीमराव शंकर जाधव हे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच प्रतापपूर येथील तरुणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. उलटलेल्या बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना प्रतापपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी असलेले संजय पाडवी आणि शकुंतलाबाई हिरे यांना प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.