🔥 TRENDING Ramayana Grosses Rs 155 Crore Globally... Suriya's 'Scene' Opens Strong at Box O... Meghalaya CM Proposes Establishment of... બાવળા શહેરી વિસ્તારોમાંથી વિદેશી દારૂ... Experts Urge Preservation of Natural A... Cabinet Approves Unified Pension Schem...
06 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

टोकवडे ग्रामीण रुग्णालयात दिवाळीच्या दिवशी १६ यशस्वी शस्त्रक्रिया; वैद्यकीय पथकाकडून ‘आरोग्याचा प्रकाश’.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 06 Nov 2026, 08:19 PM 👁 12
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
टोकवडे ग्रामीण रुग्णालयात दिवाळीच्या दिवशी १६ यशस्वी शस्त्रक्रिया; वैद्यकीय पथकाकडून ‘आरोग्याचा प्रकाश’
नीड २४ न्यूज महाराष्ट्र
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड.
विशेष वृत्त
दिनांक: ०७ नोव्हेंबर, २०२६
मुरबाड, टोकावडे : धनत्रयोदशी आणि दीपावली सणाच्या सुट्ट्यांमध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना, मुरबाड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय टोकावडे येथील वैद्यकीय पथकाने मात्र कर्तव्याला प्राधान्य देत रुग्णसेवेचा नवा आदर्श घालून दिला आहे. धनत्रयोदशीच्या पावन पर्वावर शासकीय सुट्टी असूनही या रुग्णालयात तब्बल १६ क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या. सणाच्या दिवशी शस्त्रक्रियेच्या माध्यमातून १६ रुग्णांना आजारपणातून मुक्त करत रुग्णालयाने त्यांच्या कुटुंबात खऱ्या अर्थाने आरोग्याची दिवाळी साजरी केली आहे.
या विशेष मोहिमेत रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोग तज्ञ, भूलतज्ञ आणि कर्तव्यावर असलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली.
शस्त्रक्रियांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे:
• हर्निया (Hernia) – ५ शस्त्रक्रिया: रुग्णांच्या आतड्याचा भाग बाहेर येऊन तीव्र वेदना होत होत्या व आतडे सडण्याचा मोठा धोका होता. वेळेत शस्त्रक्रिया करून या रुग्णांना जीवदान देण्यात आले.
• सिझेरियन (C-Section) – ५ शस्त्रक्रिया: प्रसूतीदरम्यान बाळाची हृदयगती कमी होणे किंवा आईला अडचण निर्माण झाल्याने, माता व बालकाचे प्राण वाचवण्यासाठी तातडीने या सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
• मुळव्याध (Piles) – २ शस्त्रक्रिया: सततचा रक्तस्त्राव आणि तीव्र मलावरोधामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना कायमस्वरूपी आराम देण्यासाठी या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
• गर्भाशय काढणे (Hysterectomy) – २ शस्त्रक्रिया: अति-रक्तस्त्राव आणि गर्भाशयातील गाठींमुळे महिलांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी या शस्त्रक्रिया गरजेच्या होत्या.
• कुटुंब नियोजन – २ शस्त्रक्रिया: मातेचे आरोग्य उत्तम राहावे आणि कुटुंबाचा आकार मर्यादित राहावा यासाठी या स्वेच्छा शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
सणासुदीच्या काळात खाजगी रुग्णालये बंद किंवा महागडी सेवा देत असताना, टोकावडे ग्रामीण रुग्णालयाने सर्वसामान्य रुग्णांसाठी आपले दरवाजे उघडे ठेवून मोफत आणि दर्जेदार सेवा दिली. शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या या संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष भूमिकेचे ठाणे जिल्हा आणि मुरबाड तालुक्यातून प्रचंड कौतुक होत आहे.
ब्युरो रिपोर्ट, नीड २४ न्यूज महाराष्ट.
📲Get App