शिक्षा
शिवार आंबेरे शाळेची आदर्श शाळा व शिक्षिका रश्मी राजन वाडेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
यहाँ देखें:
▶️ YouTube
जिल्हा परिषद आदर्श शाळा शिवार आंबेरे नं. २ ला २०२४‑२५ चा आदर्श शाळा पुरस्कार व शिक्षिका रश्मी राजन वाडेकर यांना यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शिवार आंबेरे नं. २, रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळेने शैक्षणिक, क्रीडा व विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून २०२४‑२५ शैक्षणिक वर्षासाठी आदर्श शाळा पुरस्कार मिळवला आहे.
या शाळेत पहिली ते पाचवी वर्ग असून सौ. रश्मी राजन वाडेकर व श्री. राजन बाळकृष्ण वाडेकर हे शिक्षक कार्यरत आहेत. मर्यादित सुविधा व भौगोलिक अडचणींवर मात करत शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे.
चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचा निकाल १०० टक्के मिळाल्याबरोबर एका विद्यार्थिनीने गुणवत्ता यादीत स्थान मिळवले; मंथन परीक्षेतही दोन विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत झळकल्या. क्रीडा क्षेत्रात सलग तीन वर्षे जिल्हास्तरीय स्पर्धेपर्यंत पोहोचले आहेत.
परसबाग उपक्रमातही शाळेने सलग तीन वर्षे तालुका स्तरावर स्थान मिळवले, यावर्षी तालुका प्रथम व जिल्हा चौथा क्रमांक मिळवला. या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेऊन शाळेला आदर्श शाळा पुरस्कार व सौ. रश्मी राजन वाडेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ, मुंबई मंडळाचे सदस्य व ग्रामपंचायतीची टीम यांचे सहकार्य आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन या यशाचे प्रमुख कारण असल्याचे मान्य केले आहे, ज्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे.