🔥 ट्रेंडिंग રાજકોટમાં આંબેડકર ચોક નજીક પરેશ ચૌહાણન... LCB ઝોન-8એ 4 વર્ષથી ફરતા વાહનચોરી આરોપ... Mathura मिशन शक्ति से मिला बेटियों को... उत्तर प्रदेश एड्स नियंत्रण सोसाइटी कर्... અમદાવાદમાં 'મિશન સાયબર રક્ષિકા' હેઠળ 8... કોયારી ગામે મહાકાળી માતાના સાતમા પ્રાણ...
13 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
शेंदुर्णी-पहूर रस्त्यावर भीषण अपघात; सासू-जावयाचा जागीच मृत्यू.....!!

शेंदुर्णी-पहूर रस्त्यावर भीषण अपघात; सासू-जावयाचा जागीच मृत्यू.....!!

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 13 अक्टू. 2026, 03:55 PM 👁 15
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

जामनेर - जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी-पहूर मार्गावरील गोगळी नदीच्या पुलावर झालेल्या भीषण अपघातात सासू आणि जावयाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे गोंडखेड आणि सातगाव डोंगरी परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो पिकअप आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात विमलबाई ओंकार परदेशी (वय ७५, रा. गोंडखेड, ता. जामनेर) आणि राजू बाबुलाल परदेशी (वय ५५, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

धार्मिक कार्यक्रमासाठी जात असताना काळाचा घाला -

विमलबाई परदेशी यांच्या पतीसह दोन मुलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे त्या आपली विवाहित मुलगी राहत असलेल्या सातगाव डोंगरी येथे वास्तव्यास होत्या. नवरात्रोत्सवानिमित्त त्यांच्या मूळ गावी गोंडखेड येथे भावकीने सप्ताहाचे आयोजन केले होते. या धार्मिक कार्यक्रमासाठी जाण्यासाठी जावई राजू परदेशी हे सासू विमलबाई यांना आपल्या दुचाकीवरून (एमएच १९ ईएच ०४९९) गोंडखेडकडे घेऊन जात होते.

दरम्यान, शेंदुर्णी-पहूर रस्त्यावरील घोडेपीर बाबा दर्ग्यासमोर असलेल्या गोगळी नदीच्या पुलावर समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

नवरात्रोत्सवाच्या काळात धार्मिक कार्यासाठी निघालेल्या सासू-जावयावर काळाने घाला घातल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा अपघाती मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
📲Get App