🔥 TRENDING અરવલ્લી SOG પોલીસની સફળ કામગીરી: ખેડા... ગોધરામાં 2,500થી વધુ લાભાર્થીઓ માટેનું... जिलाधिकारी मधुसूदन हुलंगी ने देवरिया म... Government Extends Deployment of 273 C... Delhi’s AQI Exceeds 300 Amidst GRAP Me... Delhi Traffic Police Issues Advisory A...
23 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Politics

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी गुन्हे अंगावर घेऊ; काळू नदी धरणग्रस्त संस्थेचा जमिनींचा ताबा घेण्याचा इशारा

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 23 Oct 2026, 02:02 PM 👁 27
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी गुन्हे अंगावर घेऊ; काळू नदी धरणग्रस्त संस्थेचा जमिनींचा ताबा घेण्याचा इशारा
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक २३/१०/२०२६
मुरबाड (विशेष प्रतिनिधी, नीड २४ न्यूज):
काळू नदी धरण प्रकल्पाविरोधात स्थानिक भूमिपुत्रांनी आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबईतील बड्या गुंतवणूकदारांनी येथील जमिनी कमी दरात खरेदी करून त्या वर्षानुवर्षे पडीक ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, विस्थापित शेतकरी या जमिनींवर आपला कायदेशीर हक्क सांगून त्यांचा प्रत्यक्ष ताबा मिळवणार, असा थेट इशारा काळू नदी धरणग्रस्त सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रसंगी स्वतःवर गुन्हे दाखल करून घेण्याचीही आमची तयारी आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष शिरोळे यांनी स्पष्ट केले.
मुंबई उच्च न्यायालयाने काळू धरणावरील स्थगिती उठवल्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. याच दरम्यान माळ, बोरसुंगे आणि मांदोशी परिसरातील पुनर्वसनाच्या जमिनी मुंबईतील गुंतवणूकदारांनी खरेदी केल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर चासोळे ग्रामपंचायत हद्दीतील भांगवाडी येथे धरणविरोधी विचारविनिमय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीत पाणीटंचाईवर गंभीर चर्चा
या बैठकीत बोलताना चासोळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नामदेव शेढे यांनी डोंगराळ आणि पठारी भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी 'उपसा जलसिंचन योजना' राबवण्याची जोरदार मागणी केली. आदिवासी पाड्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने, मोठ्या धरणांऐवजी भांगवाडी, जांभूळवाडी आणि माळ परिसरात लहान बंधारे उभारण्याचे प्रस्ताव तयार करावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. यामुळे आदिवासी बांधवांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटेल आणि मौल्यवान सुपीक जमिनीही वाचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीला पश्चिम व उत्तर महाराष्ट्र प्रकल्पविरोधी शेतकरी समन्वय समितीचे महासंघटक प्रशांत सरखोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष संतोष शिरोळे, शाई संघर्ष समितीचे उमेश वारघडे व रमेश भोईर, संस्थेचे मार्गदर्शक जयवंत राऊत व रघुनाथ देशमुख, बुधाजी वाख, चासोळेचे सरपंच रामचंद्र मेंगाळ, श्रमिक मुक्ती संघटनेचे हरी वाख, काळू नदी संस्थेचे उपाध्यक्ष सय्यद शेख, कार्याध्यक्ष गणेश देशमुख, सचिव विलास पठारे, कोषाध्यक्ष शाम देशमुख, सहसचिव कैलास निमसे आणि सहकोषाध्यक्ष रोशन चौधरी यांच्यासह माळ पठार भागातील आदिवासी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📲Get App