🔥 TRENDING ऑर्डनेंस फैक्ट्री इटारसी में दिखा तेंद... જૂનાગઢ કોંગ્રેસ દ્વારા 'વોટ ચોરી'ની તપ... ભરૂચ: સોનતલાવડી ઝૂંપડપટ્ટી પાસે કોમન પ... Chirag Paswan Calls Out Bihar's Rising... Dilip Buildcon Secures Rs 688-Crore NH... Tata Teleservices (Maharashtra) Ltd To...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाईन भरणे बंधनकारक; वेळेत माहिती न भरल्यास पगार रखडणार

शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाईन भरणे बंधनकारक; वेळेत माहिती न भरल्यास पगार रखडणार

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 04 Sep 2026, 04:04 PM 👁 56
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाईन भरणे बंधनकारक; वेळेत माहिती न भरल्यास पगार रखडणार!२४ न्यूज (ठाणे जिल्हा रिपोर्टर: काशिनाथ देसले): शासकीय कर्मचाऱ्यांचा एक सर्वंकष आणि अचूक माहितीकोष तयार करण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलली असून, सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती ऑनलाईन प्रणालीवर भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ही माहिती वेळेत न भरल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचा पगार अडकू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.या कर्मचाऱ्यांची माहिती भरणे आवश्यक:या ऑनलाईन प्रणालीमध्ये नियमित कर्मचाऱ्यांसह, नियमिततेतर आस्थापना, रोजंदारी, अंशकालीन आणि मानसेवी कर्मचाऱ्यांची माहिती भरावी लागणार आहे.माहितीकोषात कोणत्या गोष्टींचा समावेश असेल?शासकीय कर्मचाऱ्यांच्या या सर्वंकष माहितीकोषात खालील वैयक्तिक, सेवाविषयक आणि आर्थिक तपशील गोळा केले जाणार आहेत:वैयक्तिक आणि ओळख तपशील: कर्मचाऱ्याचे नाव, सेवाभर्ती आयडी (Sevaarth ID), जन्मतारीख, लिंग, आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी.सामाजिक तपशील: सामाजिक प्रवर्ग, जात, धर्म आणि दिव्यांगत्व (असल्यास).सेवा आणि आर्थिक तपशील: सध्याचे पद, पदनाम, सेवेत रुजू झाल्याची तारीख, निवृत्तीची तारीख, भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक (GPF/DCPS), पदोन्नतीची तारीख आणि जुलै २०२६ मधील संपूर्ण वेतनाची तपशीलवार माहिती.माहिती संकलनाचा उद्देश:या मोहिमेमुळे शासकीय मनुष्यबळाची अगदी अचूक संख्या प्रशासनासमोर येणार आहे. तसेच रिक्त पदांची सद्यस्थिती काय आहे आणि शासनाचा वेनावरील एकूण खर्च किती होतो, याचे स्पष्ट चित्र समोर येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागांना ही माहिती तातडीने आणि अचूकपणे भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
📲Get App