🔥 TRENDING અંકલેશ્વર નજીક વનખાડીનું પાણી લાલ થતાં... फिरोजाबाद: सुभाष चौराहे पर रुपयों के व... ભરૂચમાં પ્રથમ શ્રાદ્ધ નિમિત્તે પાંજરાપ... Ambala Construction Site Collapse Leav... Kharif Acreage Surpasses Five‑Year Ave... Rumor of Student Rape Sparks Protests...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
शिरपूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला, थोडक्यात बचावली

शिरपूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला, थोडक्यात बचावली

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 20 Sep 2026, 11:35 AM 👁 56
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनधी

दहा दिवसांपूर्वीच अर्थे येथे दीड वर्षीय बालकाचा घेतला होता बळी; वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांमध्ये संताप

शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी जवळील ममाणे शिवारात बिबट्याने थेट झोपडीत शिरून झोपलेल्या महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने महिलेने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तिचा जीव थोडक्यात बचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ममाणे शिवारातील शेतात असलेल्या झोपडीत ज्योती मोरे या महिला झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट झोपडीत प्रवेश करत त्यांच्यावर हल्ला चढवला. ज्योती मोरे यांनी आरडाओरडा करत प्रतिकार केल्याने बिबट्याने धूम ठोकली. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अवघ्या दहा दिवसांपूर्वीच याच परिसरातील अर्थे गावात बिबट्याने दीड वर्षीय बालकाला उचलून नेत ठार केल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. सलग दुसऱ्या घटनेमुळे तऱ्हाडी, ममाणे, अर्थे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी, महिला आणि लहान मुलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

दरम्यान, वारंवार घटना घडूनही बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभाग आणि प्रशासनाला अपयश येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बिबट्याला तातडीने पकडून पिंजऱ्यात जेरबंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
📲Get App