🔥 ट्रेंडिंग एटा में पाँच वांछित अपराधियों पर 15,00... અમદાવાદના મકતમપુરામાં જાહેર ગટરની સમસ્... भारत ने श्रीलंका को 3 टन एंटी-टीबी दवा... एशियन गेम्स में स्वर्ण पदक जीतने पर अस... एटा में जनगणना-2027 की तैयारियां तेज,... असम ट्राइब्यून ने 'अदृश्य दर्शकों' पर...
07 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
कृषि

श्री विघ्नहर साखर कारखाना जुन्नर या कारखान्याचा 41 वा गाळप हंगाम समारंभ संपन्न

✍️ रिपोर्टर: Ashok durgude 🗓 07 अक्टू. 2026, 06:00 PM 👁 23
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

जुन्नर येथील श्री विघ्नहर साखर कारखाना या कारखान्याचा 41 वा गाळप हंगाम शुभारंभ आज झाला.

जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर साखर कारखाना जुन्नर /आंबेगाव या कारखान्याच्या 41 वा गाळप हंगामाला सुरुवात करण्यात आली उसाची मुळी टाकून गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती खासदार श्री डॉक्टर अमोल कोल्हे उपस्थित होते प्रमुख पाहुणे तालुक्याचे आमदार श्री शरद दादा सोनवणे होते. याप्रसंगी माजी आमदार श्री दिलीप ढमढेरे तसेच माजी आमदार श्री अतुल बेनके व व बाजार समितीचे सभापती श्री संजयराव काळे साहेब मुख्य अतिथी होती याप्रसंगी अनेक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य कारखान्याचे संपूर्ण संचालक मंडळ तसेच शेतकरी सभासद कर्मचारी उपस्थित होते कारखान्याची चेअरमन श्री सत्यशिल शेरकर यांनी गाळपाविषयी व सरकारच्या धोरण विषयी सभासदांना व शेतकऱ्यांना संबोधित केले यावेळी शासनाने 15 ऑक्टोबर पर्यंत कारखाने सुरू करण्याचे सूचना दिली असल्यामुळे यावेळेस गाळप हंगाम लवकर चालू होणार आहे त्यामुळे गाळप हंगामात आवश्यकते ट्रॅक्टर मजूर ट्रक हार्वेस्टर मशीन जुळवा जुळव करण्यात आली आहे पुढे दुष्काळाचे सावट असल्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत जाईल याची दक्षता कारखाना घेणार आहे असे प्रतिपादन कारखान्याचे चेरमन श्री सत्यशिल शेरकर यांनी केली. यावेळी खासदार अमोल कोल्हे आमदार शरद सोनवणे तसेच माजी आमदार अतुल बेनके व बाजार समिती सभापती श्री संजय राव काळे यांची सुद्धा भाषणे झाली प्रतिप्रमाणे पूजन गव्हाणी मध्ये मुळी टाकून शुभारंभ करण्यात आला कारखान्याचे चेअरमन यांनी सर्वांचे आभार मानले
📲Get App