🔥 TRENDING Sikar Roads Cleared as Vendors' Carts... Rain Alert Issued for Bikaner and Shek... Tamil Nadu Launches SPEED Card System... Elephant wanders to Tamil Nadu dam for... Tamil Nadu CM Vijay urges Centre to re... Madhya Pradesh to Disburse Rs 502 Cror...
12 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

श्री महालक्ष्मी मंदिरात मल्लाव समाजाचा भक्तिमय जसबाजी कार्यक्रम

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 12 Oct 2026, 02:28 PM 👁 19
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

समस्त मल्लाव समाज, घोडनदी-शिरूर

श्री महालक्ष्मी मंदिरात मल्लाव समाजाचा भक्तिमय जसबाजी कार्यक्रम

शिरूर (प्रतिनिधी) : 12 ऑक्टोंबर 2026
काची आळी, शिरूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात, श्री. मनसुख बाळाराम कसुरे व श्री. धरमचंद किसन कसुरे यांच्या घरासमोरील मंदिर परिसरात आज समस्त मल्लाव समाज, घोडनदी-शिरूर यांच्या वतीने भक्तिमय वातावरणात जसबाजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास मल्लाव समाजाचे अध्यक्ष श्री. अविनाश हरिभाऊ मल्लाव व श्री. अनिल दिवाणजी मल्लाव महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
भारतीय जनवादी पार्टी व तथा राष्ट्रीय मानव अधिकार सपोर्ट (गव्हर्मेंट ऑफ इंडिया ) पुणे जिल्हाध्यक्ष यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक जसबाजीच्या माध्यमातून धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्यात आले.

कार्यक्रमात ढोलकी वादक श्री. फकीरचंद किसन मल्लाव यांनी साथसंगत केली. तसेच जस गायक श्री. रामचंद्र दगडोबा चौधरी, रोहिदास चंदर सल्ले, मनसुख बाळाराम कसुरे, रमेश गंगाराम मल्लाव, अनिल दिवाणजी मल्लाव, एकनाथ चंदर कसुरे, गोपीचंद किसन मल्लाव, भगाराम दगडोबा चौधरी, परशुराम देवराम चौधरी आदी जस गायकांनी सहभाग घेतला.

जसबाजीच्या सादरीकरणामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मल्लाव समाजाची पारंपरिक लोककला, धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला. उपस्थित समाजबांधवांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.
📲Get App