🔥 TRENDING एटा मेडिकल कॉलेज में नर्सिंग स्टाफ का... मोतिहारी में यात्रियों मुफ्त यात्री बस... E‑commerce mega‑sale sees 40% jump in... Cabinet to Consider 3-4% Dearness Allo... Tungabhadra Reservoir Level Remains St... Bengaluru Allows Only Green Firecracke...
15 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

शिरूर शहरात खळबळ; इंदुबाई वीर यांच्या गळ्यातील दागिने लुटले

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 15 Oct 2026, 01:31 PM 👁 3
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मुंबई भाजीबाजार परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटले

शिरूर शहरात खळबळ; इंदुबाई वीर यांच्या गळ्यातील दागिने लुटले

मुंबई भाजीबाजार परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटले; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

शिरूर | 15 ऑक्टोबर 2026

शिरूर शहरातील मुंबई भाजीबाजार परिसरात इंदुबाई वीर वय 50 यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पिस्तुलाचा धाक दाखवून लुटल्याची घटना आज पहाटे 5 वाजून 30 मिनिटांनी घडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुण वाहनावरून आले आणि इंदुबाई वीर यांच्या दिशेने पिस्तुल रोखून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, त्याच्या आधारे संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, आरोपींची ओळख व घटनेतील शस्त्राबाबत तपास सुरू आहे.

काची आळी परिसरातील रेखा पोपट कोतवाल यांच्या मंगळसूत्र चोरीच्या घटनेनंतर पुन्हा दागिने लुटल्याची घटना घडल्याने शिरूर शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संवेदनशील भागांमध्ये, विशेषतः पहाटेच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
📲Get App