🔥 ट्रेंडिंग સિંધુ ભવન રોડ પર ટ્રાફિક પોલીસે વાહનો... અમદાવાદ ગોમતીપુરમાં AMC દ્વારા દબાણ હટ... कटिहार में हत्या के प्रयास का अभियुक्त... न्याय की मांग को लेकर स्थानीय निवासियो... राघोपुर के रामपुर श्यामचंद में नाव पलट... બાપુનગર ચાર રસ્તા પર ટ્રાફિક સમસ્યા: ન...
14 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
अपराध

शिरूर नगरपरिषदेच्या भंगार चोरीप्रकरणी बेमुदत सत्याग्रह; आरोपींच्या अटकेची मागणी

✍️ रिपोर्टर: Anil Mallav 🗓 14 अक्टू. 2026, 02:55 PM 👁 13
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

प्रवासी संघ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिरूर पोलीस ठाण्यासमोर बेमुदत सत्याग्रह आंदोलन

शिरूर नगरपरिषदेच्या भंगार चोरीप्रकरणी बेमुदत सत्याग्रह; आरोपींच्या अटकेची मागणी

पुणे जिल्हा रिपोर्टर
14 ऑक्टोंबर 2026
शिरूर नगरपरिषदेच्या मालकीचे मौल्यवान भंगार साहित्य चोरीला गेल्याच्या प्रकरणात पोलीस तक्रार दाखल होऊनही संशयितांवर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत प्रवासी संघ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिरूर पोलीस ठाण्यासमोर बेमुदत सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

नगरपरिषदेचे भंगार साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले असताना ते चोरीला जाणे गंभीर बाब असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून चोरीमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घ्यावा आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

या प्रकरणात आरोपी आणि फिर्यादी यांच्यात साटेलोटे असल्याचा तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या आरोपांचीही चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रवासी संघाचे अनिल बांडे आणि मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असून, संबंधित प्रकरणात तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

“जोपर्यंत चोरीप्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
आता या प्रकरणात शिरूर पोलिसांकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि चौकशीत नेमकी काय माहिती समोर येते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
📲Get App