🔥 TRENDING IGN India Unveils Official Launch Trai... TRIS Travels aims to centre Meghalaya... Jaipur Food Safety Team Finds 4‑Day Ol... खेड़ली 132 केवी जीएसएस में 2.5 घंटे बि... वृन्दावन में प्रेमनन्द जी महाराज के एक... Parineeti Chopra’s investigative thril...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

शुल्कभार हलका : व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 'डेव्हलपमेंट फी'पासून सुटका; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा.

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 28 Sep 2026, 07:36 PM 👁 14
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

शुल्कभार हलका : व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 'डेव्हलपमेंट फी'पासून सुटका; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

Need 24News .वृत्तसेवाजिल्हा रिपोर्टर: काशिनाथ देसले, ठाणेतालुका रिपोर्टर: किशोर पवार, मुरबाडदिनांक: २८ सप्टेंबर २०२६ठाणे/मुरबाड:रा ज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी यापुढे शिक्षण शुल्कासोबत (ट्युशन फी) स्वतंत्र विकास शुल्क (डेव्हलपमेंट फी) भरण्याची गरज भासणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय शुल्क नियामक प्राधिकरणाने (FRA) घेतला आहे.उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार, आता डेव्हलपमेंट फी ही ट्युशन फीमध्येच समाविष्ट केली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शुल्कामध्ये मोठा दिलासा मिळणार असून शिष्यवृत्तीधारकांनाही याचा थेट फायदा होणार आहे.मुलींना मिळणार थेट फायदाव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या पात्र मुलींना सरकारच्या योजनांनुसार शुल्क सवलत दिली जाते. मुलींना ट्युशन फी आणि परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलत मिळत असली, तरी त्यांना डेव्हलपमेंट फी भरावी लागत होती. मात्र, आता हे शुल्कच स्वतंत्र राहणार नसल्याने, पुढील शैक्षणिक वर्षापासून मुलींना पूर्ण शुल्कमाफीचा लाभ मिळणार आहे. मुलींना प्रवेश घेताना आता कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.या अभ्यासक्रमांना लागू होणार बदल:हा नवा नियम अभियांत्रिकी (Engineering), वैद्यकीय (Medical), फार्मसी (Pharmacy), मॅनेजमेंट (Management), बीबीए (BBA), बीसीए (BCA), हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, लॉ (Law), आणि बीएड (B.Ed) यांसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना लागू होणार आहे.काय होईल शुल्कावर परिणाम?ट्युशन फीमध्येच समावेश: डेव्हलपमेंट फी वेगळी न आकारता ती ट्युशन फीचाच भाग असेल.शुल्काचे प्रमाण: सीईटी सेलमार्फत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ट्युशन फीच्या साधारण १० ते १५ टक्के डेव्हलपमेंट फी आकारली जाते.किती आहे शिक्षण शुल्क?: राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण शुल्क साधारण ४० हजारांपासून १२ लाखांपर्यंत आहे.विद्यार्थ्यांना दिलासा: या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता चार हजारांपासून ते तब्बल १ लाख ७० हजारांपर्यंतच्या शुल्काचा मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.'एफआरए'कडून २०२७-२८ या शैक्षणिक वर्षासाठी महाविद्यालयांकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काचे प्रस्ताव स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, शुल्क नियमन कायद्यातील बदलांनुसारच हे प्रस्ताव स्वीकारले जात आहेत, अशी माहिती 'एफआरए'च्या अध्यक्षांनी दिली आहे. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांचा आर्थिक भार हलका होणार आहे.
📲Get App