🔥 TRENDING Deadly attack in Yemen's Taiz province... Karnataka to Build Mandapam Like Bhara... Netanyahu's Secret Abu Dhabi Visit: Me... Over 2,000 police deployed as stone‑pe... PM Modi Says India Gave Befitting Repl... Iran's IRGC Says It Captured Second US...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
शेकडो दिव्यांग बांधवांचे अनुदान रखडले, तहसीलदारांना निवेदन

शेकडो दिव्यांग बांधवांचे अनुदान रखडले, तहसीलदारांना निवेदन

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 17 Sep 2026, 06:38 PM 👁 55
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी



आठ दिवसांत न्यायाचे आश्वासन
तहसीलदार म्हणाले - कोणाचेही अनुदान थांबणार नाही

---

बातमी -

जामनेर, दि. १७ - जामनेर तहसील कार्यालयात आज दिव्यांग बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी एकत्र येत निवेदन दिले. विश्वशांती दिव्यांग बहुउद्देशीय संस्था, जामनेर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो दिव्यांग बांधव या वेळी उपस्थित होते.

दिव्यांग बांधवांचे शासनाकडून मिळणारे मासिक अनुदान गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत असल्याने दिव्यांग बांधवांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच केवायसी आणि पोर्टल संबंधी येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनेकांचे अनुदान बंद झाले आहे. हे अनुदान त्वरित सुरू करावे, या प्रमुख मागणीसाठी हे निवेदन देण्यात आले.

यावेळी दिव्यांग बांधवांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार आगळे साहेब आणि संजय निराधार शाखेच्या शिवदे मॅडम यांची भेट घेतली. आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या.

या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देत तहसीलदार आगळे साहेबांनी आश्वासन दिले की, येत्या आठ दिवसांत सर्व दिव्यांग बांधवांना न्याय दिला जाईल आणि कोणाचेही अनुदान थांबवले जाणार नाही. राहिलेली केवायसी आणि पोर्टलची प्रक्रिया त्वरित पूर्ण करून घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

तहसीलदारांच्या या आश्वासनानंतर दिव्यांग बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.
📲Get App