🔥 TRENDING NCBએ અમદાવાદના સરખેજ વિસ્તારમાં MD ડ્ર... સાબરકાંઠા માં જનજાતીય ગૌરવ દિવસ પર વિજ... Delhi Police Seize ₹5 Crore Heroin, Ar... Delhi's AQI spikes to 511, air quality... ਲਾਪਤਾ ਢਾਈ ਸਾਲਾ ਮਾਸੂਮ ਦੀ ਗੁਆਂਢੀਆਂ ਦੀ ਛੱ... मूलाना ग्राम पंचायत में सरपंच चुनाव: द...
15 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

शहाद्यात भगवान बिरसा मुंडा यांची 151 वी जयंती उत्साहात साजरी आमदार राजेश दादा पाडवी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 15 Nov 2026, 03:52 PM 👁 24
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

शहाद्यात भगवान बिरसा मुंडा यांची 151 वी जयंती उत्साहात साजरी आमदार राजेश दादा पाडवी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन

शहाद्यात भगवान बिरसा मुंडा यांची 151 वी जयंती उत्साहात साजरी
आमदार राजेश दादा पाडवी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन
शहादा, दि. 15 - क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंती निमित्त शहादा येथे जनजातीय गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने महोत्सव आदिवासी कलागुणांचा या उपक्रमाचे आयोजन शहादा येथे करण्यात आले होते.
यावेळी आमदार श्री. राजेश दादा पाडवी, तहसीलदार श्री. संभाजी पाटील तसेच पोलीस निरीक्षक हेमंत पाटील साहेब यांच्या हस्ते क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव केला.
या दिवशी महारक्तदान शिबीर, यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, आदिवासी कला व संस्कृतीचे दर्शन घडवणारे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, जल-जंगल-जमीन वाचवण्यासाठी दिलेले योगदान आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा गौरव दिवस साजरा केला जातो.
या कार्यक्रमाला शहादा तालुक्यातील आदिवासी बांधव, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहादा - बिरसा मुंडा जयंती | आमदार राजेश पाडवी, तहसीलदार संभाजी पाटील यांच्या हस्ते पूजन
🙏 शहादा - जनजातीय गौरव दिवस 🙏
भगवान बिरसा मुंडा यांची 151 वी जयंती उत्साहात साजरी!
आमदार श्री. राजेश दादा पाडवी, तहसीलदार श्री. संभाजी पाटील व पोलीस निरीक्षक हेमंत पाटील साहेब यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
जय बिरसा! जय जोहार! 🏹
शहादा 🏹
बिरसा मुंडा 151 वी जयंती 🙏
आमदार राजेश दादा पाडवी, तहसीलदार संभाजी पाटील, PI हेमंत पाटील यांच्या हस्ते पूजन
📲Get App