🔥 ट्रेंडिंग প্রয়াত নানা পাটেকরকে চলচ্চিত্র মহলে শ... गुना में 2.50 लाख रुपये मूल्य के गांजा... माय भारत केंद्र के अंतर्गत जिला स्तर प... एक्सट्रैक्शन 3 के लिए क्रिस हेम्सवर्थ... साइजू कुरुप ने ‘हरिवरासनम’ के डबिंग को... नॉरव्यू हाई स्कूल में गोलीबारी: एक छात...
08 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

शहा येथे पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी बोअरवेल काम सुरू, सरपंच दिलीप बापू पाटील यांनी विकास कामावर चर्चा

✍️ रिपोर्टर: Dilip Ghoyak Nagare 🗓 08 अक्टू. 2026, 08:12 AM 👁 45
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

शहा येथे पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी नवीन बोअरवेल काम सुरू झाले असून, सरपंच दिलीप बापू पाटील यांनी या विकास कामावर चर्चा केली.

हेडलाईन..

आदर्श सरपंच दिलीप बापू पाटील .यांच्या प्रयत्नाला यश; शहा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात बोरवेलला भरपूर पाणी.

शहा (ता. इंदापूर ). दि. ७ ऑक्टोबर - गावच्या विकासासाठी नेहमी तत्पर असणारे .आणि गोरगरीब जनतेची कामे स्वतः उपस्थित राहून सोडवणारे. विद्यमान सरपंच श्री. दिलीप बापू पाटील .यांना नुकताच आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या याच विकासाभिमुख कार्याची पावती म्हणून. आज आणखी एका कामाला यश मिळाले आहे.

दिनांक ७ ऑक्टोबर रोजी शहा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पाण्याची मोठी टंचाई होती. पशुधनासाठी आणि दवाखान्याच्या कामकाजासाठी पाण्याची गरज लक्षात घेऊन सरपंच दिलीप बापू पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन बोरवेल घेण्याचे नियोजन केले.

आज या ठिकाणी बोरवेलचे काम करताना सरपंच स्वतः उपस्थित होते. सुदैवाने या बोरवेलला भरपूर प्रमाणात पाणी लागले असून परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कामाचा माणूस... विकासाचा विश्वास!
गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर, जनतेच्या सुख-दुःखात कायम सोबत असणारे आणि विकासकामांना प्राधान्य देणारे. नेतृत्व म्हणून सरपंच दिलीप बापू पाटील यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या या कार्यामुळे गावात विकासाची नवी दिशा मिळत असून ग्रामस्थांमधून त्यांचे कौतुक होत आहे.
📲Get App