🔥 TRENDING Flamingos flock to Rajasthan's Sambhar... Tamil Nadu, Karnataka Spark New Flag D... Tasmac Stores Face Queues Amid ₹10 Pri... Tiruvallur Bans Liquor Sales Near Andh... Voice Sample Inconclusive, Court Rejec... गांव निनान त. भादरा जि. हनुमानगढ़ राजस्...
03 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

शहा येथे मोफत वैरण बियाणे वाटप, पशुपालकांना मोठा दिलासाफ

✍️ Reporter: रीपोर्टर दिलीप नगरे 🗓 03 Nov 2026, 10:39 AM 👁 61
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

शहा मध्ये आज मोफत वैरण बियाणे वितरित करण्यात आले, ज्यामुळे स्थानिक पशुपालकांना मोठी मदत मिळाली.

शहा, इंदापूर (प्रतिनिधी) दि. 03 नोव्हेंबर 2026 -

पुणे जिल्हा परिषद, पुणे व महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने आज शहा येथे पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या माध्यमातून मोफत वैरण बियाणे वाटप कार्यक्रम 2026-2027 मोठ्या उत्साहात पार पडला.

पशुवैद्यकीय चिकित्सालय, शहा येथे सकाळी 9 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद सदस्य मा यशराज (भैय्या) जगदाळे, पंचायत समिती सदस्या मा सौ कल्पनाताई विष्णू पाटील, पंचायत समिती सदस्य अजित खबाले तालुका पशुसंवर्धन व दुग्ध विकास अधिकारी मा डॉ संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन मा डॉ सचिन खेमलापुरे व शहाचे पशुवैद्यकीय अधिकारी मा डॉ मारुती काझडे आदर्श सरपंच श्री दिलीप पाटील माजी सरपंच श्री विष्णू आबा पाटील तंटामुक्त अध्यक्ष धनाजी इजगुडे ह भ प भाऊ महाराज खबाले प्रकाश पाटिल ज्ञानदेव इजगुडे दत्तात्रय बनसोडे बलभीम गंगावणे हनुमंत पांढरे हनुमंत निकम शौकत मुलाणी व सर्व शहा ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

यावेळी शहा व परिसरातील शेकडो पशुपालक शेतकऱ्यांनी 7/12, रेशन कार्ड, आधार कार्डसह उपस्थित राहून योजनेचा लाभ घेतला. बियाणे मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर वाटप करण्यात आले. तसेच एका रेशन कार्डवर एकाच लाभार्थ्याला लाभ देण्यात आला.

चारा टंचाईवर मात करण्यासाठी व दुधाळ जनावरांसाठी सकस वैरण उपलब्ध व्हावी या उद्देशाने शासनाची ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत असल्याची प्रतिक्रिया यावेळी पशुपालकांनी व्यक्त केली.
📲Get App