🔥 TRENDING આજ રોજ સિદ્ધપુર તાલુકાના સમોડા ગામે ડ... Adarsh ramlila samiti jamsar Breaking news લાલપુરમાં હત્યા-લૂંટ કેસમાં આરોપીને છ... वाराणसी में MLC चुनाव: 75,000 मतदाता 3... भोरमध्ये मतदान केंद्र परिसरात पैसे वाट...
23 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

शहा येथे जगाचा मालक संत बाळूमामांचा जन्मोत्सव सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न

✍️ Reporter: रीपोर्टर दिलीप नगरे 🗓 23 Oct 2026, 04:08 PM 👁 22
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

शहा येथे आयोजित झालेल्या संत बाळूमामांच्या जन्मोत्सव सोहळ्यात हजारो भाविकांनी सहभागी होऊन उत्सव साजरा केला.

शहा तालुका इंदापूर. येथील श्री संत सद्गुरू बाळुमामा मंदिरात आज जगाचा मालक श्री संत बाळुमामांचा जन्मोत्सव सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला.

आज सकाळी 10 ते 12 या वेळेत महाराष्ट्र केसरी ह.भ.प. लालचंद महाराज चोपडे यांच्या सुश्राव्य कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. महाराजांनी बाळूमामांच्या चरित्रावर आणि भक्ती महात्म्यावर प्रकाश टाकत उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. कीर्तनानंतर मंदिरात विधिवत आरती करण्यात आली.

आरतीनंतर हजारो भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील व पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला व बाळूमामांचे दर्शन घेतले.

यावेळी मंदिर परिसर फुलांनी आणि आकर्षक सजावटीने सजवण्यात आला होता. बाळूमामा, विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तींना फुलांच्या माळांनी सजवण्यात आले होते. मंदिर समितीने या सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन केले होते.
बाळूमामांच्या चैतन्यदायी वास्तव्याने शहा नगरी आज भक्तिमय झाली होती.
📲Get App