Education
स्वेरीच्या वेदांत देशमुख यांची आय.आय.टी. मद्रास येथे इंटर्नशिपसाठी निवड
Watch on:
▶️ YouTube
गोपाळपूर (ता. पंढरपूर ) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षात शिक्षण घेणारे वेदांत विश्वासराव देशमुख यांची भारतातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या मद्रास (तामिळनाडू) येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय.आय.टी. मद्रास) येथे इंटर्नशिपसाठी नुकतीच निवड झाली असून या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्वेरीच्या वेदांत देशमुख यांची आय.आय.टी. मद्रास येथे इंटर्नशिपसाठी निवड
पंढरपूर : गोपाळपूर (ता. पंढरपूर ) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षात शिक्षण घेणारे वेदांत विश्वासराव देशमुख यांची भारतातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या मद्रास (तामिळनाडू) येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय.आय.टी. मद्रास) येथे इंटर्नशिपसाठी नुकतीच निवड झाली असून या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वेदांत विश्वासराव देशमुख यांना आय.आय.टी. मद्रास मधील केंद्रीय कौशल्य प्रशिक्षण आणि फॅब्रिकेशन सुविधा (सीएसटीएफ) विभागात इंटर्नशिप करण्याची संधी प्राप्त झाली आहे. या इंटर्नशिपच्या माध्यमातून त्यांना औद्योगिक क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, प्रात्यक्षिक ज्ञान तसेच तांत्रिक कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळणार आहे. आय.आय.टी. मद्राससारख्या प्रतिष्ठित संस्थेत इंटर्नशिप करण्याची संधी मिळणे ही महाविद्यालयासाठी तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागासाठी अभिमानाची बाब आहे. या यशाबद्दल वेदांत देशमुख यांनी स्वेरी संस्थेचे आभार मानले आहेत तसेच संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.संदीप वांगीकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग, प्राध्यापक वर्ग व सहकारी यांनी केलेले मोलाचे मार्गदर्शन वेदांत देशमुख यांना उपयोगी पडल्याचे त्यांनी सांगीतले. स्वेरी कॅम्पस मधील शैक्षणिक वातावरण, सातत्याने मिळणारे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन यामुळेच ही अनमोल संधी प्राप्त झाल्याची भावना देखील वेदांत यांनी व्यक्त करून ‘भविष्यात या इंटर्नशिपमधून मिळणारे ज्ञान आणि अनुभव आपल्या शैक्षणिक तसेच व्यावसायिक वाटचालीस निश्चितच उपयुक्त ठरेल’ असा विश्वास वेदांत देशमुख यांनी व्यक्त केला. वेदांत देशमुख यांच्या निवडीमुळे संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. सतीश मांडवे, पदवी इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, इतर अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.