🔥 TRENDING वाराणसी के काशी अन्नपूर्णा मठ में अन्न... Today jkpc persident and MLA Handwara... ਹੋਸ਼ਿਆਰਪੁਰ ਬੈਂਕ ਵਿੱਚ ਬਾਈਕ ਚੋਰੀ: ਮਹਿਲਾ... बीकानेर के गिराजसर में पुश्करणा पुरोहि... Another milestone in the development... ଝାରବନ୍ଧ ପୋଲିସ ର ବଡ଼ ସଫଳତା, ରାମଲାଲ ହତ୍ୟ...
10 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला मोठे यश; शहाद्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 10 Nov 2026, 09:34 PM 👁 35
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला मोठे यश; शहाद्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला मोठे यश; शहाद्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
शहादा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्०या सातत्यपूर्ण संघर्षामुळे आणि आंदोलनामुळे यंदाच्या ऊस हंगामात शेतकऱ्यांना ऐतिहासिक यश मिळाले आहे। मागील ऊस हंगामात उसाचा दर प्रति टन २,८०० रुपये इतका होता. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक भूमिकेमुळे वर्ष २०२६-२०२७ च्या चालू हंगामात हा दर थेट ३,४११ रुपये पर्यंत वाढला आहे.
या ऐतिहासिक दरवाढीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षाच्या तुलनेत यंदा प्रति टन तब्बल ६११ रुपये जास्त भाव मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि शहादा परिसरातील प्रमुख नेते घनश्याम भाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादित करण्यात आले आहे.
या घवघवीत यशामुळे शहादा परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आणि आदरणीय राजू शेट्टी तसेच घनश्याम भाई पाटील यांचे खूप खूप आभार मानले आहेत. संघटनेच्या या यशामुळे परिसरात सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
📲Get App