🔥 TRENDING ছেলের খুন নিয়ে মুখ্যমন্ত্রীর দরবারে ভ... સરદાર વલ્લભભાઈ પટેલ જન્મજયંતિ પર અરવલ્... ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ, ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ಖಾಲಿ... हिमायपुर में महिला ने दंडवत करके जिलाध... ECI extends SIR deadline in six states... Rahul Gandhi Visits Sangrur, Signals C...
30 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

साताऱ्यात एसटी स्टँड परिसरात तीन वर्षांचा चिमुकला आढळला; नातेवाइकांचा शोध सुरू

✍️ Reporter: Yallappa Rayagond Ragate 🗓 30 Oct 2026, 11:34 AM 👁 16
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
साताऱ्यात एसटी स्टँड परिसरात तीन वर्षांचा चिमुकला आढळला; नातेवाइकांचा शोध सुरू
सातारा : सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसटी स्टँड परिसरात गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अंदाजे तीन वर्षांचा एक लहान मुलगा आढळून आला आहे. दक्ष सुदर्शन पवार असे या मुलाचे नाव असून, त्याच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
सदर मुलाच्या नातेवाइकांबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुलाची ओळख पटवून त्याच्या नातेवाइकांपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
संपर्कासाठी क्रमांक :
सातारा शहर पोलीस ठाणे : 02162-230580
महिला पोलीस उपनिरीक्षक इंगळे : 9284378879
या मुलाला ओळखणाऱ्या किंवा त्याच्या कुटुंबीयांबाबत माहिती असलेल्या नागरिकांनी वरील क्रमांकावर संपर्क साधावा. ही माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवून मुलाच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
📲Get App