🔥 TRENDING Two Young Men Fatally Injured in High-... સુરત મહાનગરપાલિકાએ મિલકત વેરા વસૂલાત મ... Assam's Samay Turns Compassion into a... Assam's Ashmita Chaliha Upsets World N... સુરત મહાનગરપાલિકાએ તહેવારોમાં ખાદ્ય સુ... राजपाल लम्बोरिया को पदोन्नति, हनुमानगढ...
22 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

*सासवड मध्ये भैरवनाथ नवरात्री निमित्त भव्य आतिषबाजी

✍️ Reporter: Shreeneek Dipak Gaikwad 🗓 22 Oct 2026, 10:54 PM 👁 12
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
*सासवड मध्ये भैरवनाथ नवरात्री निमित्त भव्य आतिषबाजी*

*सासवड, ता. पुरंदर:* सासवड येथे श्री भैरवनाथ नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

नवरात्रीच्या निमित्ताने काल रात्री श्री भैरवनाथ मंदिरात भव्य फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. आकर्षक रोषणाई आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे संपूर्ण सासवड नगरी उजळून निघाली होती. "भैरवनाथाच्या नावानं चांगभलं" च्या जयघोषात भाविकांनी हा सोहळा अनुभवला.

यावेळी स्थानिक ग्रामस्थ, तरुण मंडळ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आतिषबाजी पाहण्यासाठी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी मोठी गर्दी केली होती.

नवरात्र उत्सव काळात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
📲Get App