🔥 TRENDING વિશ્વ હિન્દુ પરિષદ અને બજરંગ દળે દુર્ગ... Tripura Fisheries to Sell 10,117 kg Fi... Himachal Apple Crop Suffers as Delayed... Madhya Pradesh CM Mohan Yadav Declares... ઇડર પોલીસે સજા વોરન્ટમાં નાસતા ફરતા આર... વડોદરા કોર્ટમાં હાઈવોલ્ટેજ ડ્રામા: જજન...
17 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Politics

सरळगाव येथे 'नमो सेवा परिपूर्ती अभियानाचा' सांगता सोहळा उत्साहात संपन्न

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 17 Oct 2026, 12:19 AM 👁 15
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
सरळगाव येथे 'नमो सेवा परिपूर्ती अभियानाचा' सांगता सोहळा उत्साहात संपन्न
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
दिनांक १७१०/२०२६. (विशेष बातमी पत्र )
सरळगाव (मुरबाड):
भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या २५ वर्षांच्या यशस्वी राजकीय आणि ऐतिहासिक सेवाकाळाचा गौरव करण्यासाठी मुरबाड तालुक्यात विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विशेष पुढाकाराने आयोजित करण्यात आलेले 'नमो सेवा परिपूर्ती अभियान' अत्यंत उत्साहात पार पडले. पडघा येथून सुरू झालेल्या या जनजागृती व गौरव सोहळ्याची सांगता मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथे एका प्रबोधनात्मक आणि मार्मिक पथनाट्याने करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात करताना श्री. जयवंत सूर्यराव सर यांनी अत्यंत प्रभावी प्रास्ताविक केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या २५ वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय आणि प्रशासकीय कार्यकाळातील ऐतिहासिक निर्णय, लोककल्याणकारी योजना आणि देशाच्या विकासातील योगदानाची इत्यंभूत व सविस्तर माहिती उपस्थितांसमोर सादर केली.
या सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने भाजप ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. घाडी साहेब, मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती श्री. दीपक पवार, श्री. भुंडेरे सर, माजी सरपंच श्री. मधुकर मोरेश्वर घुडे सौ. तोंडलीकर मॅडम,श्री दिपकजी खाटेघरे श्री. मोहपे, आणि श्री. अण्णा शिंगोले त्याच बरोबर भिवंडी येथून आलेले भा ज प कार्य कर्ते यांचा समावेश होता. माननीय कपिल पाटील माजी केंद्रीय मंत्री यांच्या सोबतच तालुक्यातील भाजपचे सर्व सक्रिय कार्यकर्ते आणि सरळगाव परिसरातील मोदीप्रेमी, सुजाण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सादर करण्यात आलेल्या मार्मिक आणि प्रबोधनपर पथनाट्याने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. आयोजकांनी घेतलेले अतोनात मेहनत आणि नियोजनबद्धतेमुळे हा सेवा परिपूर्ती कार्यक्रम कमालीचा यशस्वी ठरला.
📲Get App