🔥 TRENDING पूर्णिया में विधान परिषद चुनाव 2026 की... Leaders Detained as Protesters Block B... UCC के प्रारूप पर कांकेर में मंथन, समा... BSF seizes 1.44 kg heroin dropped by P... High‑speed truck slams into e‑rickshaw... कोसी स्नातक निर्वाचन क्षेत्र से जन सुर...
15 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Education

सरळगांव जि. प. शाळेचा कायापालट; मुख्यध्यापक नरेश परदेशी सर यांचा ठाणे येथे जाहीर सत्कार!

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 15 Oct 2026, 04:09 PM 👁 18
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
सरळगांव:मुरबाड. ठाणे.दिनांक १५/१०/२०२६.
विशेष वृत्त
माजी विद्यार्थी संघ आणि लोकसहभागाच्या माध्यमातून सरळगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा संपूर्ण कायापालट केल्याबद्दल शाळेचे मुख्यध्यापक श्री. नरेश परदेशी सर यांचा ठाणे येथे गौरव करण्यात आला.
प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर अत्यंत कौतुकास्पद ठरलेल्या या उपक्रमाची दखल घेत, माजी शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे (दादा भुसे) यांच्या शुभहस्ते आणि प्रमुख लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत परदेशी सरांचा शाल, श्रीफळ व सत्कारपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
सरळगांव जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी आणि भौतिक सुविधांचा विकास करण्यासाठी मुख्यध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी संघ आणि गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले होते. या एकत्रित प्रयत्नांमुळे सरकारी शाळेचे रूपडे पूर्णपणे बदलले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आणि अद्ययावत शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे.
या दिमाखदार सोहळ्याला आमदार श्री. किसन कथोरे साहेब, कुमार आयलानी साहेब, श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब, ठाणे जिल्हाधिकारी श्री. पांचाळ साहेब, रणजित यादव साहेब, तसेच शिक्षणाधिकारी श्री. राक्षे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वच स्तरांतून मुख्यध्यापक श्री. नरेश परदेशी सर आणि सरळगांव ग्रामस्थांचे हार्दिक अभिनंदन व कौतुक होत आहे.
📲Get App