🔥 TRENDING Nagpur Records Surge in Crime: 5 Vehic... Driver Arrested Four Weeks After Deliv... Guwahati Student Found Dead; Family Ac... Delhi UT demolishes illegal structures... Crime Branch Arrests Absconding Accuse... CEA Warns Rising Global Yields and US...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
सरळगाव एमआयडीसीला शेतकऱ्यांचा पुन्हा तीव्र विरोध;
Agriculture

सरळगाव एमआयडीसीला शेतकऱ्यांचा पुन्हा तीव्र विरोध;

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 07 Sep 2026, 07:52 PM 👁 58
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
सरळगाव एमआयडीसीला शेतकऱ्यांचा पुन्हा तीव्र विरोध; ७ गावांतील जमीन संपादनाच्या हालचालींमुळे शेतकरी आक्रमकमुरबाड:मुरबाड तालुक्यातील सरळगाव एमआयडीसी (MIDC) प्रकल्पावरून प्रशासन आणि स्थानिक शेतकरी यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. सरळगाव परिसरातील सात गावांमधील १,०५० हेक्टर शेतजमिनीवर जमीन संपादनाच्या हालचाली प्रशासनाने वेगाने सुरू केल्यामुळे स्थानिक शेतकरी वर्गात तीव्र असंतोष पसरला असून, या प्रकल्पाला शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जाहीर विरोध केला आहे.१४ वर्षांनंतर हालचालींना वेग; शेतकरी संतापलेसरळगाव परिसरातील नागाव, सरळगाव, पारताळे, दहिवली, नेवाळपाडा, वडवली आणि मानिवली या सात गावांतील जमिनींवर २०१२ सालापासून एमआयडीसीचे शिक्के मारण्यात आले आहेत. तेव्हापासूनच शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला कडाडून विरोध आहे. येथील संबंधित ग्रामपंचायतींनीही यापूर्वी सरकारकडे लेखी पत्रव्यवहार करून आपली नाराजी कळवली होती. मात्र, तब्बल १४ वर्षांनंतर आता एमआयडीसीने या जमिनी ताब्यात घेण्याच्या हालचाली प्रत्यक्ष सुरू केल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.बदललेल्या परिस्थितीमुळे जमिनी देण्यास नकारगेल्या काही वर्षांत या परिसराचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. जमिनींचे बाजारभाव गगनाला भिडले असून, या भागात अनेक महत्त्वाचे प्रकल्प आधीच उभे राहिले आहेत. यामध्ये:तालुका क्रीडा संकुलठाणे जिल्हा कृषी संशोधन केंद्रकृषी विद्यालयऔषधनिर्माणशास्त्र विद्यालय (फार्मसी कॉलेज)या शैक्षणिक आणि शासकीय प्रकल्पांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि नागरिक येत आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी येथे घरे बांधून ती भाड्याने दिली असून, त्यातून अनेकांना शाश्वत उत्पन्नाचे साधन मिळाले आहे.आंदोलनाचा इशारा"आमच्या हक्काच्या शेतजमिनीचा आता आम्हाला चांगला फायदा होत असताना सरकार ती बळकावण्याचा प्रयत्न करत आहे," अशा भावना स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. आधीच जमिनींचे दर वाढलेले असताना आणि स्थानिकांना रोजगाराचे साधन मिळाले असताना, चालू झालेली जमीन संपादनाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
📲Get App