सप्तशृंगी गडावर FDA चा मोठा दणका! नवरात्रोत्सवापूर्वी ५.६२ लाखांची १,४०८ किलो भेसळयुक्त मिठाई नष्ट....!!
Watch on:
▶️ YouTube
विभागीय प्रतिनिधी
१३ आस्थापनांची झाडाझडती, १८ नमुने प्रयोगशाळेत; अस्वच्छता आणि बोगस लेबलचा पर्दाफाश
नाशिक - नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी गडावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १,४०८ किलो पामतेलयुक्त मावासदृश्य मिठाईचा साठा जागीच नष्ट करण्यात आला असून, या साठ्याची बाजारमूल्य किंमत सुमारे ५ लाख ६२ हजार रुपये आहे.
सहआयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांच्या नेतृत्वाखाली या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेदरम्यान गडावरील एकूण १३ अन्न आस्थापनांची सखोल चौकशी करण्यात आली. तपासणी दरम्यान अनेक ठिकाणी धक्कादायक बाबी समोर आल्या. मिठाईची अस्वच्छ पद्धतीने साठवणूक, असुरक्षित पद्धतीने वाहतूक आणि अन्नपदार्थांच्या लेबलमध्ये मोठ्या त्रुटी आढळून आल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करत १८ विविध अन्न नमुने तपासणीसाठी ताब्यात घेऊन ते विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
केवळ दंडात्मक कारवाई न करता, या वेळी प्रशासनाने मिठाई विक्रेत्यांना स्वच्छता राखणे, योग्य पद्धतीने साठवणूक करणे आणि अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या नियमांचे पालन करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शनही केले.
नवरात्रोत्सव काळात गडावर येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, हेच या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे गडावरील भेसळयुक्त मिठाई विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.