🔥 TRENDING चौड़ागांव की आम बस्ती ने भाजपा प्रत्या... धनतेरस: 6 नवंबर को धन्वंतरि एवं लक्ष्म... Puliya ke pass पंचायत चुनाव 2026 में पुलिस व स्काउट ग... बहराइच में धनतेरस-दीपावली के दौरान 3 द... Congress MP Calls for CBI Probe into I...
05 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख १७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २५८ कोटी ६४ हाजाराची मदत जमा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची अग्रीम आर्थिक मदत; उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच लाभ

✍️ Reporter: Yasin Hussain Shikalkar 🗓 05 Nov 2026, 07:44 PM 👁 7
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
सोलापूर, दि. ५ (जिमाका) : सन २०२६ च्या खरीप हंगामात राज्यातील ट्रिगर-१ लागू झालेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपये अग्रीम आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयास दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी द्यावयाच्या मदतीचे स्वरूप अंतिम करण्यासाठी पीक वर्गवारीनिहाय व क्षेत्रनिहाय तपशील निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तातडीचा आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतील निर्देशानुसार प्रत्येकी ५ हजार रुपये अग्रीम मदत देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. सद्यस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील ९ लाख ५२ हजार ५८ शेतकऱ्यांच्या याद्यांना ई-पंचनामा पोर्टलवर मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ५ लाख १७ हजार २८५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण २५८ कोटी ६४ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्येही मदतीची रक्कम लवकरच जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
📲Get App