🔥 TRENDING SOG Officer Arrested, Renewing Scrutin... Warrants Served on TMC Leaders in Nand... BJP booth president gunned down in Bol... Car crashes into railings after hittin... Bus crashes into crowd in Indore, kill... Three family members killed in car‑sco...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
रायते पूल अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर.
Local

रायते पूल अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर.

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 17 Sep 2026, 09:44 AM 👁 122
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
रायते पूल अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीरनीड २४ न्यूजजिल्हा प्रतिनिधी: काशिनाथ देसले, ठाणे.तालुका प्रतिनिधी: किशोर पवार. दिनांक: १७ सप्टेंबर २०२६मुरबाड:कल्याण तालुक्यातील रायते पुलावर झालेल्या भीषण रस्ते अपघातातील मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत माहिती नुकतीच प्रशासनाकडून देण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रायते पुलावर ईको गाडी आणि मिक्सर डंपर यांच्यात झालेल्या अत्यंत भीषण अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण मुरबाड आणि कल्याण तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात होती. घटनेची माहिती मिळताच मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली होती. त्यांनी तातडीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व जिल्हाधिकारी ठाणे यांच्याशी संपर्क साधून वारसांना मदत मिळवून देण्यासाठी लेखी मागणी केली होती.अशी मिळणार मदत:शासनाने या मागणीची दखल घेत एकूण ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यामध्ये:मुख्यमंत्री सहाय्यता निधी: ३ लाख रुपयेपंतप्रधान सहाय्यता निधी: २ लाख रुपये८ वारसांच्या खात्यात पैसे जमा, ३ जणांचे कागदपत्रे अपूर्ण:प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ११ मृतकांपैकी ८ मृतांच्या वारसांची संपूर्ण कागदपत्रे गोळा झाली असून त्यांची मदत थेट बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. मात्र, उर्वरित ३ मृतांच्या वारसांनी अद्याप आवश्यक माहिती आणि कागदपत्रे प्रशासनाकडे सादर न केल्यामुळे त्यांची मदत रखडली आहे.कल्याण तहसीलदार कार्यालयाकडून वारसांचे आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. उर्वरित तिघांच्या वारसांनी आपली कागदपत्रे तातडीने कल्याण तहसीलदार यांच्याकडे सादर करावीत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत मुरबाडच्या तहसीलदारांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
📲Get App