🔥 TRENDING पुलिस अधीक्षक जालौन ने कोतवाली कोंच का... தாய்மாமன் தங்க மோதிரம்’ திட்டம். पीलीभीत: बिलसंडा थाना क्षेत्र में बस च... गांव में सड़क निर्माण न होने से ग्रामी... 🛑All bank open 🛑 பள்ளி காலாண்டு விடுமுறை.
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
रायगडच्या म्हसळ्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून वारंवार अत्याचार; दोन आरोपी अल्पवयीन
Crime

रायगडच्या म्हसळ्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून वारंवार अत्याचार; दोन आरोपी अल्पवयीन

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 18 Sep 2026, 09:08 PM 👁 66
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांपैकी दोन जण अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि हादरवणारी घटना समोर आली आहे. येथे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या ओळखीच्या तरुणांनी तिला विविध प्रकारे फसवून आणि धमकावून हे अकृत्य केले आहे. याशिवाय, एप्रिल ते जून २०२६ या कालावधीत पीडितेच्या घरी सुरू असलेल्या बांधकामाचा गैरफायदा घेत, एका ४० वर्षीय मिस्त्रीने घरात कोणी नसताना बळजबरीने घरात शिरून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

याप्रकरणी म्हसळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या पाच आरोपींपैकी दोन जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. म्हसळा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

अवघ्या एका महिन्याभरात म्हसळा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची दुसरी घटना घडल्याने नागरिकांमधून सुरक्षेबाबत मोठा रोष व्यक्त होत आहे.
📲Get App