🔥 ट्रेंडिंग पूर्व मुख्यमंत्री सिंहिलिंग में शोक सं... पंजाब: कांग्रेस नेता राजा वड़िंग के गन... गोला गोकर्णनाथ: शिव मंदिर में भव्य कॉर... A I M I M Urges Permanent Solution to... सुलतानगंज नगर परिषद के वार्ड नंबर 11मे... मिस्टरबीस्ट चैलेंज में दोपहिया वाहन ने...
29 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
स्थानीय

रवी नगरात सिमेंट रस्त्याची तोडफोड व पाणीपुरवठा समस्या: नागरिकांची नाराजी

✍️ रिपोर्टर: G. P. G. U. .7798377959 🗓 29 नव. 2026, 01:18 PM 👁 25
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

उमरी, नांदेड जिल्ह्यातील रवी नगरात सिमेंट रस्त्याची पुन्हा तोडफोड व पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या अपूर्ण कामांमुळे नागरिकांना त्रास होत आहे.

रवी नगर परिसरात नगरपालिका प्रशासनाने आधीच सिमेंट रस्त्याखाली नळाची पाईपलाईन टाकून रस्ता बांधला होता. परंतु आता तो रस्ता पुन्हा तोडून नळ फिटिंग व पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले, ज्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या कामामुळे नागरिकांनी पाईपलाईनचे नियोजन योग्य पद्धतीने का केले नाही, आधीच तयार असलेल्या सिमेंट रस्त्याची पुन्हा तोडफोड का करावी लागली, आणि या कामामुळे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत नाही का, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच या कामाची जबाबदारी नगरपालिका प्रशासन व संबंधित गुत्तेदार घेतील का, असा शंका देखील व्यक्त होत आहे.

रवी नगरात नळाद्वारे पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून परिसरातील नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे अस्वच्छता वाढत असून दुर्गंधी व रोगराईचा धोका निर्माण होत आहे.

नगरपालिका प्रशासनाकडून नाली व रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर केला जात असताना प्रत्यक्षात काही ठिकाणी कामे अर्धवट राहिल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. नाली बांधकाम व साफसफाईच्या कामात योग्य नियोजन व गुणवत्ता राखली जात नसल्याचीही नागरिकांची नाराजी आहे. नगरपालिका प्रशासनाने या तातडीच्या समस्यांची तात्काळ पाहणी करून संबंधित कामे पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
📲Get App