🔥 TRENDING Gunfire Targets Immigrant Indian’s Loc... Punjab launches VDS scheme to regulari... राजस्थान पुलिस को हत्या का मामला साबित... औरंगाब जिला के मदनपुर गांव क्षेत्र में... Two youths injured in gunfire clash be... Two Seriously Injured as Car Falls int...
30 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
रात्रभर कॉम्बिंग ऑपरेशन; ११ फरार आरोपींना अटक, १३७ लिटर हातभट्टी दारू जप्त ...धुळे पोलिसांची दमदार कारवाई....

रात्रभर कॉम्बिंग ऑपरेशन; ११ फरार आरोपींना अटक, १३७ लिटर हातभट्टी दारू जप्त ...धुळे पोलिसांची दमदार कारवाई....

✍️ Reporter: Maheshprasad Dixit 🗓 30 Sep 2026, 06:34 PM 👁 5
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

धुळे
धुळे जिल्ह्यात अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस दलाने रात्रभर विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपासून ते २५ सप्टेंबर पहाटेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. जिल्हाभरात एकाचवेळी नाकाबंदी, वाहन तपासणी आणि गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली.

या विशेष मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले असून विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या ११ पाहिजे असलेल्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच तडीपार केलेला एक इसम बेकायदेशीररित्या जिल्ह्यात वावरताना आढळल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या अभिलेखावरील ३१ हिस्ट्रीशीटर व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.

अवैध हातभट्टीवर कारवाई

अवैध हातभट्टी दारू विक्री विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ६ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाई दरम्यान १३७ लिटर गावठी हातभट्टी दारू, रसायन, वॉश, बोंबा आणि दारू निर्मितीचे साहित्य जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ८ हजार ७०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तडीपार इसम शुभम शरद माळी, वय २९, रा. चंद्रशेखरजी चाळ, भंडारी टॉकीज जवळ, शिरपूर याच्या विरोधात सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय प्रतिबंधित क्षेत्रात वावरल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

शहर वाहतूक शाखेने राबविलेल्या विशेष मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. ट्रक ओव्हरटेक, विना रिफ्लेक्टर/इशारा, फॅन्सी नंबर प्लेट, अतिरिक्त प्रवासी, मोबाईलवर संभाषण, नो-एन्ट्रीत प्रवेश, विना सीट बेल्ट अशा १७८ केसेस करून ८ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर मद्यप्राशन करून वाहन चालविण्याच्या २ प्रकरणांत २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

या मोहिमेदरम्यान जिल्ह्यात १५ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून दुचाकी व चारचाकी अशा एकूण ८६६ वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच १०३ बार, ढाबे, हॉटेल, लॉज व गेस्ट हाऊस आणि नदीकिनारे, रिकाम्या शाळा आदी ठिकाणीही तपासणी करण्यात आली.

या विशेष कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये २३ पोलीस अधिकारी आणि ६० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. जिल्ह्यात अवैध धंदे आणि असामाजिक तत्वांवर अशा प्रकारच्या मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कारवाईचा थोडक्यात आढावा:
११ फरार आरोपी अटकेत
१ तडीपार इसम ताब्यात
३१ गुन्हेगारांची तपासणी
१३७ लिटर दारू जप्त, ६ गुन्हे दाखल
८६६ वाहनांची तपासणी, १५ ठिकाणी नाकाबंदी
📲Get App