🔥 ट्रेंडिंग ગોંડલ જકાતનાકા પાસે ગેરકાયદે બાંધકામો... जमिया मस्जिद के बाहर फंडरेज़िंग अभियान... भारतीय पायलट ने ओमानी सह‑पायलट को फेल्... 'matrutikkiwala' शब्द की खोज ट्रिब्यून... ‘courageouscrew’ खोज शब्द पर ट्रिब्यून... कॉर्नेल में यौन उत्पीड़न मामले की नई ट...
01 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
अपराध

रत्नागिरीत दोन २१ वर्षीय तरुणींचे गूढ अपहरण; खेड आणि पूर्णगड पोलिसांत गुन्हे दाखल

✍️ रिपोर्टर: Aniket Mestri 🗓 01 अक्टू. 2026, 11:58 AM 👁 15
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

जिल्ह्यात अवघ्या २४ तासांत दोन २१ वर्षीय तरुणींचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी खेड आणि पूर्णगड पोलिसांत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात अवघ्या चोवीस तासांच्या अंतराने दोन २१ वर्षीय तरुणींचे गूढरीत्या अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोन्ही घटनांमध्ये अज्ञात व्यक्तींनी तरुणींचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी खेड आणि पूर्णगड पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, जिल्ह्यात यामुळे तीव्र खळबळ उडाली आहे.

पहिली घटना खेड तालुक्यात घडली. दाभिळ नाका, सातवीन गाव येथील सिंधुरा सचिन कानकुटे (वय २१) ही २८ सप्टेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास घरातून निघून गेली आणि परतली नाही. कुटुंबीयांनी शोध घेतला असता ती मिळून न आल्याने, पती सचिन भगवान कानकुटे यांनी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्याच्या हेतूने पळवून नेल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

दुसरी घटना पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावडे आंबेरे, हनुमानवाडी येथे घडली. सानिया दामोदर नाटेकर (वय २१) ही २९ सप्टेंबर रोजी सकाळी रत्नागिरी येथे मोबाईलचा डिस्प्ले बदलून येत असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली, मात्र ती घरी परतली नाही. आई दामिनी दामोदर नाटेकर यांनी आपल्या मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पूर्णगड पोलिसांत दाखल केली आहे.

या दोन्ही घटनांप्रकरणी खेड व पूर्णगड पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १४०(३) अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. एकाच वयोगटातील दोन तरुणी अचानक अशा प्रकारे बेपत्ता झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, दोन्ही पोलीस ठाण्यांची पथके या तरुणींचा कसून शोध घेत आहेत.
📲Get App