🔥 ट्रेंडिंग 🛑All bank open 🛑 பள்ளி காலாண்டு விடுமுறை. बीरम में भाजपा कार्यकर्ता की हत्या मिथुन राशि का आज का राशिफल: तेज़ कार्य... एलपीयू में छात्र बवाल: रेप अफवाह पर प्... एसओजी अधिकारी की गिरफ्तारी से फरवरी के...
28 सित. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
रत्नागिरी पोलीसांनी गणेशोत्सवासाठी विशेष तयारी, समन्वय बैठक पूर्ण
स्थानीय

रत्नागिरी पोलीसांनी गणेशोत्सवासाठी विशेष तयारी, समन्वय बैठक पूर्ण

✍️ रिपोर्टर: Aniket Mestri 🗓 06 सित. 2026, 11:30 AM 👁 41
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

रत्नागिरी पोलीस दलाने ४ सप्टेंबर २०२६ रोजी सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक घेऊन, शांततापूर्ण व सुरक्षित गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या.

रत्नागिरी जिल्ह्यात आगामी गणेशोत्सव शांततापूर्ण, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा व्हावा यासाठी पोलीस दलाने विशेष तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली.

ही बैठक ४ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

बैठकीदरम्यान पोलीस अधीक्षकांनी सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला आणि मंडळांनी विविध समस्या, सूचना व अपेक्षा मांडल्या. चर्चा दरम्यान ध्वनीप्रदूषण, वाहतूक व्यवस्था, मंडप उभारणी व विद्युत व्यवस्थेची सुरक्षितता, अग्निसुरक्षा व सार्वजनिक स्वच्छता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सर्व मंडळांना शासन, प्रशासन व न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

गणेशोत्सव हा सार्वजनिक उत्सव असल्याने सामाजिक सलोखा, बंधुभाव व शांतता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले. रत्नागिरी पोलीस दल व सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण करण्यावर भर देण्यात आला आणि नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले, ज्यामुळे उत्सव सुरक्षित व आनंददायी वातावरणात साजरा होईल.
📲Get App