🔥 ट्रेंडिंग आंध्र प्रदेश के जलाशय में पाँच महिलाओं... गुजराती पुरुष पर यूएस में पत्नी की हत्... गुजरात कांग्रेस ने 25% उर्वरक मूल्य वृ... गुजराती लोकगायक आदित्य गढवी ने गरबा मे... अन्वे ड्रविड़ ने विनू मानक टॉफी में 15... रानजी ट्रॉफी 2026/27 कैसे देखें: लाइव...
17 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
मनोरंजन

रेणुका माता मंदिरात मल्लाव समाजाचा जसबाजी कार्यक्रम उत्साहात संपन्न

✍️ रिपोर्टर: Anil Mallav 🗓 17 अक्टू. 2026, 01:34 AM 👁 26
यहाँ देखें: ▶️ YouTube 📘 Facebook 📷 Instagram
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

रेणुका माता मंदिरात समस्त मल्लाव समाज, शिरूर यांच्या वतीने पारंपरिक जसबाजी

रेणुका माता मंदिरात मल्लाव समाजाचा जसबाजी कार्यक्रम उत्साहात संपन्न

शिरूर | 17ऑक्टोबर 2026
शिरूर शहरातील मुंबई बाजार येथील रेणुका माता मंदिरात समस्त मल्लाव समाज, शिरूर यांच्या वतीने पारंपरिक जसबाजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या विशेष कार्यक्रमात पारंपरिक ढोलकीच्या तालावर मंत्रमुग्ध करणारे जसगायन सादर करण्यात आले. शिरूर परिसरातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याचा आणि संस्कृतीची वीण घट्ट ठेवण्याचा सुंदर संदेश दिला.
कार्यक्रमाला आपल्या कलागुणांनी अधिक रंगत आणत ढोलकी वादक फकीरचंद किसन मल्लाव यांनी उत्कृष्ट साथ दिली. तसेच, जसगायनात रामचंद्र दगडोबा चौधरी, गोपीचंद किसन मल्लाव, रोहिदास चंदर सल्ले, अनिल दिवाणजी मल्लाव, रमेश गंगाराम मल्लाव, गुलाब प्रेमा कोतवाल, मनसुख बाळाराम कसुरे, खुशालचंद बाळाराम कसुरे, एकनाथ चंदर कसुरे आणि राजेंद्र सिताराम मल्लाव यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
पारंपरिक जसबाजीच्या या उपक्रमातून समाजातील आपुलकी, बंधुभाव, एकजूट आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा मुख्य उद्देश साध्य झाला. या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमामुळे संपूर्ण रेणुका माता मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.
📲Get App