🔥 TRENDING Assam to Export Methanol to Bangladesh... जालौन में पुलिस मुठभेड़: माता मंदिर से... NDRF Rescues Girl from 80‑ft Borewell... LPU Postpones Mid‑Term Exams, Suspends... Netanyahu Visits Abu Dhabi, Meets UAE... 23-Year-Old Missing After Saving Three...
28 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
रेल्वे स्थानकांवर हॉटस्पॉट शेअरिंगबाबत सायबर धोक्याचा इशारा; अनोळखी व्यक्तींना इंटरनेट देऊ नका
Technology

रेल्वे स्थानकांवर हॉटस्पॉट शेअरिंगबाबत सायबर धोक्याचा इशारा; अनोळखी व्यक्तींना इंटरनेट देऊ नका

✍️ Reporter: Vishnu Pawar 🗓 23 Aug 2026, 11:47 PM 👁 55
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

रेल्वे स्थानकांवर अनोळखी व्यक्तींकडून हॉटस्पॉटची मागणी केली जात असून, सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या रेल्वे स्थानकांवर एक नवीन प्रकारचा सायबर स्कॅन सुरू झाल्याचे समोर आले आहे. रेल्वे स्थानकांवर उभे असताना काही अनोळखी मुले किंवा मुली प्रवाशांकडे त्यांचा मोबाईल हॉटस्पॉट शेअर करण्याची मागणी करत आहेत. अशा प्रकारे अनोळखी व्यक्तींना हॉटस्पॉट दिल्यास तुमच्या वैयक्तिक माहितीला धोका निर्माण होऊ शकतो.

सायबर तज्ज्ञांच्या मते, हॉटस्पॉट शेअर केल्यामुळे समोरची व्यक्ती तुमच्या फोनमधील डेटा किंवा गोपनीय माहिती चोरू शकते. अनेकदा सायबर गुन्हेगार अशा पद्धतीचा वापर करून लोकांच्या मोबाईलमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करतात.

त्यामुळे, रेल्वे स्थानक किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अनोळखी व्यक्तीने हॉटस्पॉटची मागणी केल्यास त्यांना नकार देणे हिताचे आहे. आपल्या मोबाईलची सुरक्षितता जपण्यासाठी अनोळखी व्यक्तींशी इंटरनेट कनेक्शन शेअर करणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
📲Get App