राज्यात दुष्काळाचे संकट गहिरे, बळीराजाच्या मदतीसाठी IAS-IPS अधिकारी सरसावले; एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला.....!
विभागीय प्रतिनिधी
मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील प्रशासकीय यंत्रणा पुढे सरसावली आहे. राज्यातील सर्व IAS आणि IPS अधिकाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी म्हणून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सध्या राज्यभरात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी शेतातील उभी पिके करपून जात आहेत. त्यातच पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.
या संकटाच्या काळात बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी राज्यातील सर्व सनदी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. सर्व IAS आणि IPS अधिकाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केले जाणार आहे. ही रक्कम दुष्काळग्रस्त भागातील मदत कार्यासाठी वापरली जाणार आहे.
या संदर्भात सर्व अधिकाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन मदत कार्यासाठी द्यायला इच्छुक असल्याचे पत्र सरकारला दिले होते. त्यानुसार आता ही देणगी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.