🔥 TRENDING INDIA Bloc Announces Protest Against E... India's Manufacturing PMI Rebounds in... Bihar Floods Disrupt 200,000 Lives as... भारी ट्रकों और धूल से परेशान बरियारपुर... Police Identify 40 Persons in LPU Viol... Delhi's Air Quality Deteriorates as AQ...
01 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

राजापूर तहसील कार्यालयात ५ ऑक्टोबर रोजी महसूल लोक अदालत; प्रलंबित दावे निकाली काढण्याची सुवर्णसंधी

✍️ Reporter: Dr.Aniket Mestri 🗓 01 Oct 2026, 08:20 PM 👁 12
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

राजापूर तालुक्यात प्रलंबित महसुली दावे आपापसांत तडजोडीने निकाली काढण्यासाठी ५ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यातून नागरिकांचा वेळ, पैसा वाचणार आहे.

राजापूर तालुक्यातील प्रलंबित महसुली दावे आपापसांत तडजोडीने निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत अभियाना’अंतर्गत आगामी सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राजापूर तहसील कार्यालयात महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या शासन स्तरावर १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत हे अभियान राबवले जात आहे. याद्वारे जमिनीचे हक्क, वाटपाचे दावे तसेच वहिवाटीच्या रस्त्यांसारखे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले वाद दोन्ही पक्षांच्या संमतीने मिटवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी संबंधित पक्षकारांनी ‘प्रपत्र-अ’नुसार तडजोडीसाठी अर्ज करणे बंधनकारक असून, छाननीनंतर लोक अदालतीच्या दिवशी अंतिम आदेश दिले जाणार आहेत.

या उपक्रमामुळे नागरिकांचा अमूल्य वेळ, पैसा आणि न्यायालयीन फेऱ्यांचा त्रास वाचणार असून महसूल यंत्रणेवरील ताणही कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिक, शेतकरी आणि पक्षकारांनी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता राजापूर तहसील कार्यालयात उपस्थित राहून या लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विकास गंबरे यांनी केले आहे.
📲Get App