🔥 TRENDING Three Children and a Youth Drown in So... Ujjain Creates History: 35,000 Girls P... मुख्य कार्यपालन अधिकारी ने प्राथमिक स्... Light 4.1‑Magnitude Earthquake Hits Sh... Rajasthan Police Raid MD Drugs Factory... દક્ષિણ ગુજરાતના ઉદ્યોગો પર 8 કલાકના વી...
17 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या देशसेवेनिमित्त मुरबाडमध्ये 'भव्य आदिवासी भोंडाई महोत्सव'; पारंपरिक वेशभूषेत जनसागर उसळला!

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 17 Oct 2026, 04:02 PM 👁 58
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या देशसेवेनिमित्त मुरबाडमध्ये 'भव्य आदिवासी भोंडाई महोत्सव'; पारंपरिक वेशभूषेत जनसागर उसळला!
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे.
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
ठाणे (विशेष प्रतिनिधी)
दिनांक १७/१०/२०२६.
टोकावडे, मुरबाड :: देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या २५ वर्षांच्या अखंड लोकसेवेची परिपूर्ती झाल्याचे औचित्य साधून आज, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून मुरबाड तालुक्यात "भव्य सामुदायिक आदिवासी भोंडाई महोत्सव" अत्यंत अभूतपूर्व आणि ऐतिहासिक उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला तालुक्यातील आदिवासी बांधव आणि नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
मुरबाड विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. श्री. किसनजी कथोरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. या भव्य कार्यक्रमाला मुरबाड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे (भाजप) सर्व मान्यवर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. सर्व उपस्थित नेत्यांनी आदिवासी बांधवांचा उत्साह वाढवत पंतप्रधानांच्या सेवाकार्याचा गौरव केला.
पारंपरिक वेशभूषेने वेधले लक्ष
या ऐतिहासिक महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तालुक्यातील हजारो आदिवासी महिला आणि समाजबांधव आपल्या देखण्या पारंपरिक वेशभूषेत या ठिकाणी दाखल झाले होते. पारंपारिक वाद्यांचा गजर, भोंडाईची पारंपरिक लोकगीते आणि नृत्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर आदिवासी संस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघाला होता.
कार्यकर्त्यांची मेहनत आणि नियोजन
पंतप्रधानांच्या २५ वर्षांच्या ऐतिहासिक देशसेवेला वंदन करण्यासाठी आणि आदिवासी संस्कृतीला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा भोंडाई कार्यक्रम प्रचंड यशस्वी ठरला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, ज्याचे कौतुक संपूर्ण तालुक्यात होत आहे.
📲Get App