🔥 TRENDING હિંમતનગરમાં 275 કિલો પ્રતિબંધિત પ્લાસ્... મુખ્યમંત્રીશ્રી સાથે વિશ્વની અગ્રણી એસ... मिथिला में भारद्वितीया का विशेष महत्व:... Norway Ambassador Visits Shillong, Pra... Meghalaya Cabinet Approves 2026 School... 🔴 Breaking news, : नेमावर में विश्वकर...
13 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

पुरस्कारानंतरची जबाबदारी जपणारे मा. रामदासजी राऊत

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 13 Oct 2026, 08:35 PM 👁 17
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

निर्माता, दिग्दर्शक व लेखक मा. रामदासजी राऊत यांनी तृप्ती फिल्म प्रोडक्शन

पुरस्कारानंतरची जबाबदारी जपणारे मा. रामदासजी राऊत

पुणे प्रतिनिधी.अनिल मल्लाव 13 ऑक्टोंबर 2026
कलाक्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत असलेले निर्माता, दिग्दर्शक व लेखक मा. रामदासजी राऊत यांनी तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून अनेक लघुचित्रपटांची निर्मिती करून नवोदित व ज्येष्ठ कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाची दखल घेत बेल्हे सांस्कृतिक महोत्सवात ‘संगीतरत्न मा. दत्ता महाडिक जीवनगौरव पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कारानंतरही त्यांनी ज्येष्ठ तमाशा कलावंतांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना आधार देण्याचे कार्य सुरू केले आहे.

ज्येष्ठ तमाशा कलावंत दत्तोबा चव्हाण सविंदणेकर यांची भेट घेऊन राऊत यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्या कलाप्रवासाला प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न केला. ‘घुंगरू’ या कलेवर आधारित चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली आहे.

“पुरस्काराचा आनंद घेण्यापेक्षा त्यातून मिळालेली प्रेरणा समाज व कलावंतांच्या उपयोगी आणणे हीच खरी जबाबदारी,” असे राजेंद्र डी. मोरे, बारामती यांनी सांगत राऊत यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांच्या पुढील सामाजिक व कलाक्षेत्रातील कार्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.
📲Get App