🔥 TRENDING Professor abducted during evening walk... Four‑storey building collapses in Delh... Jahnvi Kapoor’s ‘Chuttamale’ Deepfake... India's Top Archers Gear Up for Archer... Asian Premier League to Return with As... Archery Premier League Returns, Showca...
08 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

पुरस्कारानंतर ज्येष्ठ तमाशा कलावंतांसाठी रामदास राऊतांचा संकल्प

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 07 Oct 2026, 01:18 AM 👁 43
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

कलावंतांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना आवश्यक सहकार्य

पुरस्कारानंतर ज्येष्ठ तमाशा कलावंतांसाठी रामदास राऊतांचा संकल्प

पुणे जिल्हा रिपोर्टर | ७ ऑक्टोबर २०२६
बेल्हे येथील सांस्कृतिक लोककला महोत्सवात तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माता-दिग्दर्शक रामदासजी राऊत यांना ‘संगीतरत्न दत्ता महाडिक जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या सन्मानानंतर त्यांनी ज्येष्ठ तमाशा कलावंतांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना आवश्यक सहकार्य व योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचा संकल्प केला आहे.

शिरूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील ज्येष्ठ कलावंतांच्या आर्थिक व आरोग्यविषयक अडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. ‘घुंगरू’ या लोककलेवर आधारित चित्रपटाच्या निर्मितीतून मिळालेल्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर राऊतांचा हा उपक्रम लोककलेच्या जतन व संवर्धनासाठी असल्याचे सांगण्यात आले.
📲Get App