🔥 TRENDING Viral Video: The Hilarious Evolution o... The Tribune Website Displays Search Re... Fans Cause Commotion Outside Rachita R... Police Disperse Opposition Protest Dem... अटेर में बिना लाइसेंस उर्वरक विक्रय की... RBI Oct 2026 Policy: Will Sanjay Malho...
07 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

प्रेमसंबंधातुन तरुणाचा मानसिक छळ; जळगावात २८ वर्षीय तरुणाची आत्महत्या, तिघांविरुद्ध गुन्हा....!!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 07 Oct 2026, 10:12 AM 👁 9
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

जळगाव : प्रेमसंबंधाला विरोध केल्याच्या कारणावरून सतत धमकावून मानसिक त्रास दिल्याने २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देउळवाडा (ता. जि. जळगाव) येथील प्रशांत संजय सोनवणे (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत याची मावस बहीणीचे हिचे संदीप महाजन याच्याशी प्रेमसंबंध होते. या संबंधाला प्रशांत याचा विरोध होता. याच रागातून संदीप महाजन, विशाल महाजन आणि त्यांच्या आईने प्रशांतला वारंवार अडवून धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

रस्त्यात अडवून आणि विविध ठिकाणी त्रास दिल्याने प्रशांत मानसिक तणावात होता. या सततच्या त्रासाला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास प्रशांतने आसोदा उड्डाणपुलाजवळील गवळी मुंजोबा मंदिराच्या मागील शेताच्या बांधावर आत्महत्या केली. घटना समजताच परिसरात खळबळ उडाली.

या प्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तक्रारीतील आरोपांची पडताळणी सुरू आहे. पुढील तपास जळगाव तालुका पोलीस करत आहेत.
📲Get App