Local
पिंपरी पेंढार मध्ये आठवडे बाजारात ग्राहकांची चांगली गर्दी व्यापाऱ्यांची चांगली उलाढाल
पिंपरी पेंढार मध्ये आठवडे बाजारात ग्राहकांची चांगली गर्दी व्यापाऱ्यांची चांगली उलाढाल
जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावांमध्ये दर शनिवारी आठवडे बाजार भरतो . यामध्ये अनेक व्यापारी तसेच स्थानिक शेतकरी आपला ताजा भाजीपाला विक्रीसाठी आणतात आणि त्यातून चांगली उलाढाल होते. तीन वर्षापूर्वी गावातील सोशल युथ फाऊंडेशन या संघटनेने संकल्पना तयार करून जुन्या काळातील बंद झालेल्या बाजार पुन्हा दर शनिवारी सुरू केला आणि स्थानिक शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळाली काही व्यापारी बाहेर गावातून येतात परंतु स्थानिक शेतकऱ्यांना प्राधान्य असतं शेतीतील ताजा भाजीपाला लोक घेऊन येतात. प्रामुख्याने बाजार संध्याकाळी 5.00. ते9.00 वाजेपर्यंत सुरू राहतो कारण गावातील नोकरीदार तसेच बांधकाम कामगार. व्यवसायिक ग्रामस्थ संध्याकाळच्या वेळेस भाजीपाला व रोज घरात वापरणारे वस्तू खरेदी करतात. या बाजारामुळे स्थानिक दुकानदार चांगल्या प्रकारे व्यवसाय वाढू लागला आहे गावाच्या उत्पादनात चांगली वाढ झाली असून आठवडी बाजार मुळे गावाला चांगली शोभा वाढली आहे आजूबाजू गावातील लोक सुद्धा आठवडे बाजारात खरेदीसाठी बाजारात येत असतात यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि राहणीमान उंचावले आहे लोक समाधान व्यक्त करत आहे.