राजनीति
पुणे शिक्षक मतदारसंघातील आमदार कौस्तुभ गावडे यांनी पंढरपूरमध्ये घेतले विठुरायाचे आशीर्वाद
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आमदार कौस्तुभ गावडे यांनी पहिल्यांदाच पंढरपूर भेटून विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर कौस्तुभ गावडे यांनी पहिल्यांदाच श्री. क्षेत्र पंढरपूर येथे भेट देत श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. सध्या ते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान त्यांनी पंढरपुरातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली.
यावेळी श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी नतमस्तक होत आमदार गावडे यांनी दर्शन घेतले. आमदारपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी आल्याने त्यांच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.