🔥 ट्रेंडिंग ખંભાળિયા ખાતે ગાડી ચેકિંગ વર્ક અંગેની... એટ્રોસિટી એક્ટની ફરિયાદ નોંધવા માંગણી:... અગોલ પ્રાથમિક શાળાના બાળ વૈજ્ઞાનિકે વે... गुमला में दो बाइकों की टक्कर, स्कूल यू... સાણંદ તાલુકાના જુવાલગામ ખાતે જુવાલગ્રુ... फर्स्टक्राइ ने फरीदाबाद में नया स्टोर...
30 सित. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

पोलिस हवालदाराच्या नावाने एक लाखाची लाच मागणारा मध्यस्थ एसीबीच्या जाळ्यात...

✍️ रिपोर्टर: Maheshprasad Dixit 🗓 30 सित. 2026, 06:42 PM 👁 18
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

भुसावळ, दि. २९ (प्रतिनिधी) - दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलीस हवालदाराच्या नावाने लाच मागणाऱ्या एका खासगी इसमाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमन जसबिंदर सनसोये (वय ३६, रा. दीपनगर, भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय तक्रारदार आणि त्याच्या इतर तीन सहकाऱ्यांविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलीस हवालदार महेश चौधरी यांच्या नावाने अमन सनसोये याने चौघांकडून प्रत्येकी २५ हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख रुपयांची लाच मागितली होती.

या रकमेपैकी ५० हजार रुपये यापूर्वीच घेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. उर्वरित ५० हजार रुपयांसाठी वारंवार तगादा लावला जात असल्याने वैतागलेल्या तक्रारदाराने अखेर दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची शहानिशा करण्यासाठी एसीबीने त्याच दिवशी पंचांसमक्ष पडताळणी केली. पडताळणी दरम्यान संशयित अमन सनसोये याने तक्रारदाराची भेट घेऊन पोलीस हवालदार महेश चौधरी यांच्यासाठी तडजोडीअंती २० हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले.

खात्री पटल्यानंतर एसीबीच्या पथकाने आज सापळा रचून अमन सनसोये याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७(अ) अन्वये गु.र.नं. १८३/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

अशी झाली कारवाई
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकात पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, हवालदार बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर, सचिन चाटे आणि राकेश दुसाने यांचा समावेश होता.

दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीतर्फे करण्यात आले आहे.
📲Get App