🔥 TRENDING Fan's Kiss Attempt on Diljit Dosanjh S... Naga Chaitanya and Meenakshi Chaudhary... Ramrao Wadkute Passes Away, Reported b... CM Devendra Fadnavis meets NCP leader... Anand Mahindra praises Mizoram’s no‑ho... Anand Mahindra Commends Aizawl’s Exemp...
22 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Jobs & Career

पोलिस भरतीदरम्यान मासिक पाळी आल्यास दुसरा दिवस देणार

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 22 Nov 2026, 08:41 PM 👁 17
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा – पोलीस भरतीसाठी मेहनत करणाऱ्या तरुणींसाठी एक आनंदाची बातमी आहे.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा – पोलीस भरतीसाठी मेहनत करणाऱ्या तरुणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आली, तर तरुणींना पुढील तारीख किंवा काही दिवसांची मुदतवाढ दिली जाईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली आहे.
शारीरिक चाचणीदरम्यान मासिक पाळीमुळे अडथळा निर्माण होऊन तरुणींची वर्षभराची मेहनत वाया जाऊ नये, हा यामागचा उद्देश आहे. यासाठी राज्य सरकारने ५ ते ६ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. गृहराज्यमंत्री कदम यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, चर्चा करत असताना काही विद्यार्थिनींनी हा प्रश्न आमच्याकडे मांडला होता. आम्हाला मासिक पाळी असताना दुसरी संधी दिली जात नाही अशी तक्रार केली होती. हा अतिशय संवेदनशील विषय होता. याबद्दल मुख्यमंत्र्यांकडे आपण चर्चा केली. पोलीस भरतीमध्ये एखाद्या मुलीला मासिक पाळी आली तर तिला चाचणीसाठी (टेस्टिंग) दुसरा दिवस देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे त्यांनी सांगितले.
📲Get App