Local
पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतर गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी पुन्हा खुला
Watch on:
▶️ YouTube
रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे समुद्रकिनारा प्रशासनाने बंद केल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि व्यावसायिकांच्या मागणीवरून पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतर ५ सप्टेंबरपासून पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा अखेर पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार ३ सप्टेंबर रोजी गणपतीपुळे ग्रामपंचायतीने हा बीच बंद केला होता. मात्र, यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. अखेर रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतर ५ सप्टेंबरपासून हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
यापूर्वी तब्बल ६० दिवस बंद राहिल्यानंतर हा बीच सुरू करण्यात आला होता, परंतु अवघ्या १० दिवसांतच तो पुन्हा बंद करण्यात आल्याने स्थानिक व्यावसायिक आक्रमक झाले. जिल्हा परिषद सदस्य राजू साळवी यांच्या माध्यमातून ग्रामस्थ आणि व्यावसायिकांनी शुक्रवारी, ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या विशेष बैठकीला आमदार भैया सामंत आणि जिल्हाधिकारी मनुज जिंदल प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत ग्रामस्थांनी समुद्राच्या धोकादायक स्थितीबाबतची वस्तुस्थिती मांडली आणि बीच सुरू करण्याची मागणी केली. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे ६ जीवरक्षक दोन सत्रांमध्ये कार्यरत असून, त्यांच्या जोडीला जयगड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेले होमगार्डही तैनात आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पर्यटकांना समुद्राबाबत योग्य त्या सूचना दिल्या जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
ग्रामस्थांची बाजू आणि सुरक्षेची खात्री पटल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला गणपतीपुळे बीच तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता राखण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीला माजी उपसरपंच मयूर केदार, माजी सरपंच महेश ठावरे, कल्पेश सुर्वे, रवी ठावरे, अविनाश माने, उमेश भणसारी, विश्वनाथ पालकर, बंड्या घाणेकर, मंगेश गोताड, किशोर गुरव आणि तालुकाप्रमुख बंड्या साळवी उपस्थित होते. बीच पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्थ आणि व्यावसायिकांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत.