🔥 TRENDING आदरणीय राज्यपाल महोदय श्री संतोष गंगवा... Zee Business Highlights Diwali Investm... Gold and Silver Prices Updated for Nov... Democrats Win Key Gubernatorial Seats... Rain and Cooler Temperatures Expected... Cyberabad Police Urge Early Logout as...
04 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

पीकअप वाहनाने रिक्षाला धडक, १ ठार, ४ जखमी – सरळगाव, मुरबाड.

✍️ Reporter: Kashinath Desale 🗓 04 Nov 2026, 08:32 AM 👁 79
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

सकाळी ६:४५ वाजता सरळगाव, मुरबाड येथील मुक्ताबाई नगरसमोर पीकअप वाहनाने रिक्षाला धडक दिली, ज्यामुळे रिक्षातील एक फार्मासि कॉलेजची विद्यार्थी ठार आणि चार जखमी झाले.

मुरबाड जवळील सरळगांव येथे भीषण अपघात; फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, रिक्षाचालकासह ४ जण गंभीर जखमी

सरळगांव:मुरबाड
दिनांक ४/११/२०२६
जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे
तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड
मुरबाड विशेष वृत्त
मुरबाड तालुक्यातील सरळगांव जवळील मुक्ताबाई नगरसमोर आज सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान एका भरधाव पिकअप वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षामधून प्रवास करणारी एक फार्मसी कॉलेजची विद्यार्थिनी जागीच ठार झाली आहे. तर रिक्षाचालक मंगेश व्यापारी यांच्यासह अन्य तीन प्रवासी आणि एक पालक गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान सरळगांव, मुरबाड येथील मुक्ताबाई नगरसमोर हा अपघात घडला. नारायणगाव (तालुका जुन्नर, जिल्हा पुणे) येथील 'MH 14 MT 0992' क्रमांकाच्या एका वेगवान पिकअप वाहनाने समोरील रिक्षाला (क्र. MH 05 FW 3472) थेट आणि जोरात धडक दिली. ही रिक्षा मुरबाड तालुक्यातील मानिवली येथील एका व्यापाऱ्याच्या मालकीची असल्याचे समजते. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, पिकअप वाहनाचा वेग अत्यंत जास्त असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही भीषण धडक बसली.
या अपघातात रिक्षातील एका तरुण विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर रिक्षाचालक मंगेश व्यापारी आणि इतर चार जण गंभीररित्या जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. अपघातानंतर मुरबाड पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कायदेशीर कारवाई आणि तपास सुरू आहे.
📲Get App