🔥 TRENDING રાજકોટમાં કાણા પરમાર અને રાધે રાઠોડ દ્... सीनियर एसपी प्रमोद कुमार यादव ने भागलप... राजकीय उच्च प्राथमिक विद्यालय वणधर के... Harish Rao Calls for Withdrawal of GO... Nandan Nilekani says India set to lead... Telangana Man Buys Scooter with 12,300...
13 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
पाचोरा तालुक्यात गुटखा माफियांवर पोलिसांचा प्रहार; १५ लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त, एक ताब्यात.....!!

पाचोरा तालुक्यात गुटखा माफियांवर पोलिसांचा प्रहार; १५ लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त, एक ताब्यात.....!!

✍️ Reporter: Maheshprasad Ramkrishnaprasad Dixit 🗓 13 Oct 2026, 12:05 PM 👁 8
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
विभागीय प्रतिनिधी

पाचोरा - पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी इनोव्हा वाहनासह १५ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे.

पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक १२ रोजी पोलीस पथक नाकाबंदी करीत होते. दरम्यान, पहूरकडून चाळीसगावच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी इनोव्हा कार (क्र. एमएच १८, एजे- ६५२५) पोलिसांच्या निदर्शनास आली.

पोलीस नाईक दीपक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विकी इंगळे व मनोज महाजन यांनी सदर वाहनाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने वाहन न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत वाहनाचा पाठलाग करून ते ताब्यात घेतले. वाहनाची झडती घेतली असता आतमध्ये केसरयुक्त विमल पानमसाला आणि व्ही-१ सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.

चौकशीत वाहन चालकाचे नाव आबा विठ्ठल पाटील (वय ५४, रा. माऊली नगर, चाळीसगाव) असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाची माहिती तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवण्यात आले.

माहिती मिळताच अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत.

या कारवाईत पोलिसांनी प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि गुन्ह्यात वापरलेले इनोव्हा वाहन असा एकूण १५ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, पो.ना. दीपक पाटील, पो.कॉ. विकी इंगळे, पो.कॉ. शाम हटकर व पो.कॉ. मनोज महाजन यांच्या पथकाने केली.
📲Get App