Local
निवेदने आणि तक्रारी देऊन संतापलेल्या मनोज पाल यांनी आता ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शहरात इतर ठिकाणी सायंकाळी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातो, तसाच प्रयत्न बंगाली कॅम्प चौक परिसरातही करायला हवा.
चंद्रपुरातील गायब होणारा रस्ता!
चंद्रपूर शहरात रोज सायंकाळी बंगाली कॅम्प चौकातील रस्ता गायब होतो. हे आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे.
बंगाली कॅम्प चौकातील वाईन शॉप, बार आणि बिर्याणी शॉपमुळे मुख्य रस्ता ४० फुटांवरून अवघ्या १५ फुटाचा होतो.
या मार्गावरून जड वाहने, बस, चारचाकी आणि दुचाकी वाहनांची मोठी गर्दी असते. मात्र सायंकाळ झाली की वाहनांना रस्ता शोधण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते.
या समस्येबद्दल भाजप महामंत्री मनोज पाल यांनी अनेकदा तक्रार आणि निवेदने दिली. तरीही झोपेत असलेल्या प्रशासनाला अजून जाग आलेली नाही.
रस्त्याच्या कडेला दारुडे उघडपणे दारू पिताना दिसतात. चंद्रपूर मनपाच्या झोन क्रमांक ३ समोर सुद्धा दारुडे बिनधास्त दारू पितात.
शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी हे काम चंद्रपूर वाहतूक नियंत्रक विभागाचे आहे. मात्र तो विभाग सामान्य नागरिकांना चलन करण्यात व्यस्त आहे.
शहरात इतर ठिकाणी सायंकाळी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातो, तसाच प्रयत्न बंगाली कॅम्प चौक परिसरातही करायला हवा.
निवेदने आणि तक्रारी देऊन संतापलेल्या मनोज पाल यांनी आता ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत ही समस्या सुटली नाही, तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.